जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते काशीराम उबाळे यांचे अपघातात दु:खद निधन
बहुजन क्रांती सेनेचे संस्थापक : मातंग समाजावर शोककळा
वाशीम - मातंग समाजातील जेष्ठ नेते, बहूजन क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष, सलग १५ वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य, एकवेळा ग्रा.पं. उपसरपंच, पत्रकार व रिसोड तालुक्यातील ग्राम नंधाना येथील रहिवासी काशीराम दगडुजी उबाळे यांचे आज, मंगळवार १२ मे रोजी दुपारच्या वेळेस शिरपूर पांगरखेडा रोडवर झालेल्या अपघातात दु:खद निधन झाले. स्व. उबाळे हे आपल्या दुचाकीने जात असतांना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती.
काशीराम उबाळे हे मातंग समाजातील सक्रीय व धडाडीचे कार्यकर्ते होते. दलित क्रांती सेना व बहूजन क्रांती सेनेच्या माध्यमातून जिल्हयात गेल्या २० वर्षापासून त्यांनी बहूजन विचारांचे कार्यकर्ते व युवकांची मोठी फळी उभारली होती. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी बहूजनांवर झालेल्या अन्याय, अत्याचाराविरुध्द कित्येक आंदोलने व उपोषणे केली होती. सामाजीक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या कार्यांची नोंद घेवून त्यांना अनेक पुरस्कार व सन्मानाने गौरविण्यात आले होते. संघटनेच्या माध्यमातून सामाजीक कार्याबरोबरच साप्ताहिक संघर्षाची पहाट या वृत्तपत्राच्या माध्यमातून ते गेल्या १० वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत होते. लहुजी वस्ताद साळवे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांनी घालून दिलेले आदर्श व विचारांवर त्यांनी आपले संपूर्ण जीवन अर्पण करुन आपल्या हयातभर तळागाळातील गोरगरीबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून व्यवस्थेसोबत लढा दिला होता. महामानवांच्या शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा या त्रिसुत्री विचारांची शिकवण त्यांनी प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणून आपल्या मुलामुलींना गरीबीतून कष्ट करुन उच्च शिक्षण दिले. त्यांच्या या परिश्रमामुळे त्यांची दोन्ही मुले व मुली उच्चविद्या विभूषीत आहेत. एक मुलगी राज्य परिवहन सेवेत वाहक म्हणून तर दुसरी मुलगी नसिर्र्ंगचे शिक्षण घेत आहे. स्व. उबाळे यांची सुविद्य पत्नी श्रीमती रंजना उबाळे ह्या ही गेल्या १५ वर्षापासून नंधाना ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
स्व. काशीराम उबाळे यांनी आपल्या संघटनेसोबतच अनेक सामाजीक संघटनांच्या कार्याला स्वत:ला वाहून घेतले होते. त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या चाहत्यांना व कार्यकर्त्यांना जबर धक्का बसला असून मातंग समाजासह बहुजन समाजावर शोककळा पसरली आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ