लॉकडाऊनमध्येही मोरया ब्लड डोनर ग्रुपच्या रक्तदान सेवेची घोडदौड सुरु
दोनशेहुन अधिक गंभीर रुग्णांना मिळाले जीवनदान : रक्तदात्या युवकांची कोविड योध्दयाची भूमिका
वाशीम - कोरोना महामारीमध्ये आज प्रत्येकजण भयभित होवून आपला जीव वाचविण्यासाठी धडपडत असतांना अशा कठीण काळातही मोरया ब्लड डोनर ग्रुपने आपले रक्तदान सेवेच्या कार्याची घोडदौड सुरुच असून या दोन महिन्याच्या लॉकडाऊन कालावधीत ग्रुपच्या सदस्यांनी सोशल मिडीयावरुन केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देवून अनेक युवक रक्तदानासाठी कोेरोना संकटाला झुगारुन स्वेच्छेने पुढे आले आहेत. युवकांच्या या रक्तदानामुळे या दोन महिन्यात २०० हून अधिक गंभीर रुग्णांना वेळेवर रक्त मिळून त्यांचे जीवन वाचले आहे. त्यामुळे खर्या अर्थाने हे रक्तदाते कोविड योध्दयाची भूमिका निभावत असून यांना रक्तदानासाठी प्रवृत्त करणार्या मोरया ब्लड डोनर ग्रुपच्या सेवाभावी कार्याची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे.
येथील युवा समाजसेवी महेश धोंगडे व अक्षय हजारे यांना मोरया बहूउद्देशिय संस्था व मोरया ब्लड डोनर ग्रुपच्या माध्यमातून सन २०१६ पासून विविध क्षेत्रातील लोकांमध्ये रक्तदानाबद्दल जनजागृती करुन त्यांना रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला यश येत असून ग्रुपच्या माध्यमातून सोशल मिडीयावरुन केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी स्वेच्छेने व कोणताही खर्च न घेता विविध रुग्णालयातील गंभीर रुग्णांसाठी आपले रक्तदान केले आहे. रक्तदानाचे हे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात पसरले असून या ग्रुपच्या जनजागृतीमुळे रक्तदात्यांना वेळीच रक्ताची निकड असलेल्या रुग्णांची माहिती मिळून ते या रुग्णांना रक्त देण्यासाठी प्रवृत्त होतात. या समाजसेवी कार्याची दखल घेवून या ग्रुपला विविध सरकारी, निमसरकारी, सामाजीक संस्थांकडून उत्कृष्ट रक्तसेवक म्हणून विविध पुरस्कार देण्यात आले आहेत. त्यामध्ये एनएएच फाऊंडेशनच्या वतीने इंटरनॅशनल आयकॉन आणि बॉम्बे ब्लड ग्रुप कडुन उत्कृष्ट रक्तसेवक पुरस्काराचा समावेश आहे.
जनसामान्यात रक्तदान आणि नेत्रदानाची भरीव जनजागृती व्हावी या दृष्टीने मोरया बहूउद्देशिय संस्था व मोरया ब्लड डोनर ग्रुपच्या वतीने जनजागृती शिबीर, सायकल मोहीम, लाईफ सेव्ह बॉक्स, जनजागृती पत्रके आदी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यासोबतच रक्तदान दिन, थॅलेसिमिया दिन, महिला दिन, महापुरुषांची जयंती, सायकल दिन, शहीद दिनाच्या माध्यमातून रक्तदान जनजागृती केली जात आहे.
दोन महिन्याच्या लॉकडाऊन काळात ग्रुपमधील सहकारी आणि युवकांनी कोणतीही जातपात न पाहता किंवा कोरोनाने भयभित न होता सर्वधर्मसमभावाची भावना जोपासून देवळे हॉस्पीटल, सिक्युरा हॉस्पीटल, कौशल्या हॉस्पीटल, साबु हॉस्पीटल, कानडे हॉस्पीटल, मुसळे हॉस्पीटल, वरद हॉस्पीटल आदी विविध हॉस्पीटलमधील शेषराव राठोड, मारोती खडसे, चंद्रकला सरकटे, भिकुलाल हेडा, कमलबाई हरकळ, आरती कांबळे, आरती धोंगडे, समर्थ ढोबळे, शुभांगी बाजड आदी गंभीर रुग्णांसाठी निकडीच्या वेळेस त्वरीत रक्तदान केले आहे.
रक्तदानाच्या या चळवळीमध्ये महेश धोंगडे, अक्षय हजारे, अनिल पंडीत, नारायण व्यास, विजय सरकटे, गजानन धोंगडे, अक्षय धोंगडे, रवी धोंगडे, सौरभ व्यास, आनंद भावसार, विकी गायकवाड, गणेश धोंगडे, योगेश लोनसुने, विकी मानवतकर, गजानन सुर्वे, चेतन तिवारी, प्रदीप देवकर, अजय कलवार, किशन इंगोले, विशाल वानखेडे, दत्ता मोहळे, अनिल राठी, विजय महाले, अमोल ठाकुर, व्यंकटेश राजुलवार, विशाल सुरोशे, विजय सरकटे, विठ्ठल जाधव, अजय पंचभाई, आशिष राऊत, पंकज ठाकुर, केतन लोलुरे, शुभम लोलुरे, स्वराज चौबे, आशिष लोलुरे, पवन ठाकुर, ज्ञानेश्वर हजारे, शाम खोले पाटील, अजय नंदापुरे, गणेश श्रीखंडे, अमर बेनीवाले, अमोल खलसे, दिपक खडसे, हनुमान वायचाळ, शंकर सुर्वे, भुषण बाराहाते, योगेश काळबांडे, विश्वजीत धोंगडे, मुकेश धोंगडे, दिनेश मारशेटवार, सुरज इंगळे, चेतन आळणे, अमोल आढाळ, गोपाल सावंत, कपिल शर्मा, मनिष मनियार, सचिन यादव, जयंत श्रीवास, शाम गहूले, बालाजी इंगळे, राहुल परळकर, शाम खोले, सागर जाधव, भगवान मडके, रवि निंबेकर, योगेश खोडके, रितेश हंबीर, विजय गोेटे, आनंद भावसार, पंकज ठाकुर, अमोल ठाकुर, महेश हजारे, वैभव माळेकर, रवि बानकर आदी युवक भरीव योगदान देत असून शेकडो युवक या जीवनदायी कार्यामध्ये त्यांच्यासोबत जुळले आहेत.
या रक्तदान चळवळीमध्ये शासकीय रक्तपेढीचे सचिन दंडे, डॉ. लोनकर, तुषार, सुभाष फुके, लक्ष्मण जाधव, डाळे रक्तपेढीमधील नारायण डाळे, निरगुडे, विशाल, जिवन वानखेडे आदींनी विशेष सहकार्य केले आहे. कोरोनाच्या या महामारीमध्ये सर्वसामान्य भयभित असतांना निर्भिडपणे रक्तदान करणारे युवक खर्या अर्थाने कोविड योध्दाची भूमिका निभावत असून मोरया ब्लड डोनर ग्रुपच्या सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतूक केले जात आहे