सिने अभिनेता डॉ. जितेंद्र गवळी यांना पितृशोक
संभाजी कडूजी गवळी यांचे दु:खद निधन
वाशीम - सुप्रसिध्द सिनेअभिनेता डॉ. जितेंद्र गवळी यांचे वडील व माजी सैनिक संभाजी कडूजी गवळी यांचे शुक्रवार, २९ मे रोजी रात्री साडेआठ वाजता त्यांच्या रिसोड तालुक्यातील एकलासपूर येथील राहत्या घरी ह्दयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८० वर्षे होते. स्व. संभाजी गवळी यांनी यांनी सैन्यात सेवा देवून निवृत्त झाल्यानंतर गावातील नागरीकांची रेशनसाठी भटकंती थांबविण्यासाठी गावातच रेशन दुकान सुुरु केले. जवळ १५ वर्षे त्यांनी इमानेइतबारे रेशन दुकान चालवून ग्रामस्थांची सेवा केली. आपल्या स्वभावाने मनमिळावू व इतरांची सदैव मदत करणार्या स्व. संभाजी गवळी यांच्या निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे. ३० मे रोजी त्यांच्यावर स्थानिक स्मशानभूमित ग्रामस्थांच्या उपस्थितीत अंतीमसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, २ मुली, सुन, नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.