दिव्यांग आरोग्यसेवक सहदेव चंद्रशेखर यांची अविरत आरोग्यसेवा
वेतनामधील १० टक्के रक्कम पिडीत रुग्णांसाठी खर्च
कोरोना आजाराला जिल्हयातून हद्दपार करण्याचा मानस
वाशीम - जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होवू नये म्हणून शासन, प्रशासनासह सर्वसंबंधीत घटक प्राणपणाने झटत आहेत. तर जिल्हयातील आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस रुग्णांच्या उपचारासाठी अविरत आरोग्यसेवा देत आहेत. या आरोग्य यंत्रणेमध्ये शासन, प्रशासन, पोलीस, पत्रकार, डॉक्टर्स, नर्स, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका, आशासेविका, रुग्णवाहीका वाहनचालक आदी सर्व घटक जिल्हावासीयांना कोरोनाची लागण होवू नये यासाठी जीव ओतून काम करत आहेत. या आरोग्य यंत्रणेत आरोग्यसेवक म्हणून इमानेइतबाने आपले कर्तव्य पार पाडणाारे आरोग्यसेवक सहदेव चंद्रशेखर हे आजघडीला आरोग्ययंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून कोरोना योध्दाची भूमिका पार पाडत आहेत. सहदेव चंद्रशेखर हे तोंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत राजगाव उपकेंद्रामध्ये आरोग्यसेवक म्हणून गेल्या १५ वर्षापासून विनातक्रार सेवा देत आहेत. चंद्रशेखर हे स्वत: शुगर आणि बीपी या आजाराने ग्रस्त असून दिव्यांग सुध्दा आहेत. परंतु कोरोना महामारीला नामशेष करण्यासाठी संपुर्ण देश लढत असतांना चंद्रशेखर हे आपल्या दैनंदीन अडचणी, वैयक्तीक वेदना आणि कोरोनाचे भय न बाळगता नागरीकानंा आरोग्यसेवा देत आहेत. लोकांप्रती आपणही काही देणे लागतो या उदात्त हेतूने चंद्रशेखर हे आपल्या मासिक वेतनातील १० टक्के रक्कम बाजुला ठेवत असून ही रक्कम ते विविध आजाराने पिडीत असलेल्या गोरगरीब रुग्णांसाठी वैयक्तीकरित्या खर्च करीत आहेत. राजगाव उपकेंद्रामध्ये सेवा बजावत असतांना या उपकेंद्राअंतर्गत राजगाव, सायखेडा, सुकळी, देवठाणा, गणेशपुर या पाचही गावांमध्ये हिवताप, क्षयरोग, अंधत्व नियंत्रण, कुष्ठरोग, परिसर स्वच्छता, सांसर्गीक, असांसर्गीक साथीचे रोग यासोबतच कोरोनाचा संसर्ग पसरु नये यासाठी सलग १३ तास कसोशीने प्रयत्न करीत आहेत. सकाळी ८ ते दुपारी १ पर्यत शासकीय कर्तव्यानंतर दुपारी १ ते रात्री ८ वाजपेर्यत राजगाव चेकपोस्टवर येणार्या जाणार्या लोकांची आरोग्यतपासणी करण्यासाठी टिमसोबत सज्ज असतात.
जिल्हयातील सर्वसंबंधीत घटकांच्या अथक प्रयासाने वाशीम जिल्हा ग्रीन झोनमध्ये आलेला असतांना कोणत्याही हलगर्जीपणामुळे हा जिल्हा पुन्हा रेड झोनमध्ये येवू नये यासाठी जिल्हयाच्या पोलीस व आरोग्य यंत्रणेतील लहानमोठे सर्वच घटक डोळ्यात तेल घालून नागरीकांना आरोग्यसेवा देत आहेत. आरेाग्य यंत्रणेतील या लहान घटकांचे महत्व कमी लेखता येणार नाही.
कोरोनाच्या भितीमुळे आज भले भले घरात दडून बसले आहेत. परंतु कोरोनाचे कोणतेही भय न बाळगता जिवावर उदार होवून जिल्हयाच्या ग्रामीण भागात आरोग्यसेवा देणार्या या आरोग्यसेवकांच्या परिश्रमामु़ळे सर्वसामान्य जनता आपापल्या घरात सुरक्षीत आाहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातील या कोरोना योध्दांचे लढाऊ कार्य इतरांना सदैव प्रेरणा देणारे असेच आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ