Ticker

6/recent/ticker-posts

उमेद अभियान अंतर्गत मेडशी येथे कोरोना जनजागृतीला चालना : शिवभोजनस्थळी नागरीकांना मास्कचे वितरण


उमेद अभियान अंतर्गत मेडशी येथे कोरोना जनजागृतीला चालना
शिवभोजनस्थळी नागरीकांना मास्कचे वितरण
वाशीम - जगात कोरोना विषाणूने आपला राक्षसी फास आवळला असतांना जागतीक आरोग्य संघटनेने कोविड आजाराला जागतीक महामारी घोषीत करुन या आजाराची लक्षणे, उपचार आणि बचावात्मक नियमावली जारी केल्या आहेत. त्यामुळे या आजाराविषयी सर्वसमान्यांमध्ये जनजागृती करुन या घातक आजारापासून वाचविण्यासाठी भारतात शासन, प्रशासन, पोलीस, प्रसारमाध्यमे, संस्था, संघटना, व्यक्ती, महिला आदी मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. या सर्वाच्या सर्वकष व सामुहिक प्रयत्नामुळे भारतात बर्‍याच अंशी या आजाराला अटकाव बसला असून भारतातील विविध घटकाच्या सामुहिक प्रयत्नांची संपुर्ण जगात प्रशंसा होत आहे. या सामुहिक प्रयत्नांचाच एक भाग म्हणून मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष मालेगाव अंतर्गत ग्राम मेडशी येेथे वर्धिनी सौ. आशाताई रमेश तायडे यांनी सामाजीक जाणीवेतून शिवभोजन स्थळी भोजनास येणार्‍या गोरगरीब व गरजु नागरीकांना ५० मास्कचे वितरण केले. यासोबतच कोविड आजारापासून बचावासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सामाजीक जाणीवेतून उमेद अभियानातुन पुढाकार घेणार्‍या महिला वेगवेगळ्या प्रभागात असे जनजागृती अभियान राबवित आहेत.