Ticker

6/recent/ticker-posts

बहुजन मुक्ती पार्टीच्या युवा आघाडी प्रदेशाध्यक्षपदी सौरभ गायकवाड यांची नियुक्ती


बहुजन मुक्ती पार्टीच्या युवा आघाडी प्रदेशाध्यक्षपदी सौरभ गायकवाड यांची नियुक्ती
वाशीम - तळागाळातील बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी संविधानात्मक पध्दतीने लढा देणार्‍या बहुजन मुक्ती पार्टीच्या युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते सौरभ गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही.एल. मातंग यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय युवा अध्यक्ष डॉ. अनिलकुमार माने यांच्या आदेशानुसार व सहीने गायकवाड यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
  गेल्या अनेक वर्षापासून निष्ठेने बीएमपी मध्ये कार्यरत गायकवाड यांनी महासचिव पदाचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळून अनेक आंदोलन यशस्वीपणे राबविली. यासोबतच जनसामान्यांची संपर्क साधून त्यांची संघटनेची भूमिका आणि ध्येयधोरणे पटवून दिल्यामुळे त्यांच्या प्रयत्नातुन जिल्हयात अनेक जण वैचारीक संघटन असलेल्या बहूजन मुक्ती पार्टीकडे आकर्षित झाले आहेत. गायकवाड यांच्या या कार्याची वरिष्ठांनी दखल घेवून त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाचा कार्यभार सोपविला आहे. मागील विधानसभा निवडणूकीत गायकवाड यांना पार्टीने सशक्त व युवा उमेदवार म्हणून वाशीम मंगरुळपीर विधानसभा मतदार संघात उभे केले होते. या निवडणूकीत गायकवाड यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या स्टॅम्पपेपरवरील जाहीरनाम्याने मतदारांचे लक्ष आपल्याकडे आकृष्ट केले होते. या निवडणूकीत सर्वात कमी वयाचा उमेदवार म्हणून गायकवाड यांनी काट्याची लढत देत दिग्गज पक्षाच्या उमेदवारांना विचार करावयास भाग पाडले होते. आगामी काळात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बहूजन मुक्ती पार्टीचा महाराष्ट्रात व्यापक विस्तार करुन अधिकाधिक बहुजन जनतेला पार्टीच्या झेंड्याखाली एकत्र आणून मजबुत संघटन बनविण्याचा विश्वास गायकवाड यांनी आपल्या नियुक्तीबद्दल व्यक्त केला. त्यांच्या या नियुक्तीचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.