Ticker

6/recent/ticker-posts

पीपल्स रिपब्लिकन पक्षाला विधान परिषदेत प्रतिनिधीत्व देण्याची मागणी


पीपल्स रिपब्लिकन पक्षाला विधान परिषदेत प्रतिनिधीत्व देण्याची मागणी
वाशीम - पीपल्स रिपब्लिकन पक्ष हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या धर्मनिरपेक्ष आघाडीमधील महत्वाचा घटक पक्ष असून लोकसभा व निवडणूकीमध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाने महत्वपूर्ण योगदान दिले आहे. पीपल्स रिपब्लिकन पक्षाला यापूर्वी देखील विधान परिषदेमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीने सन्मानपुर्वक प्रतिनिधीत्व दिले आहे. येत्या २१ मे रोजी होवू घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणूकीत पीपल्स रिपब्लिकन पक्षाला प्रतिनिधीत्व मिळावे अशी मागणी १ मे रोजी पक्षाच्या उच्चाधिकार समितीच्या व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे झालेल्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रवक्ता चरणदास इंगोले व वाशीम जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे यांनी दिली.