Ticker

6/recent/ticker-posts

विर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा : विविध मागण्यांचे शासनाला निवेदन : राजपुत संघटनेची मागणी


विर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा
विविध मागण्यांचे शासनाला निवेदन : राजपुत संघटनेची मागणी
वाशीम - शासनाच्या उदासिन धोरणामुळे मेवाडचा शुर योध्दा, विर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या कार्याचा नव्या पिढीला विसर पडत चालला आहे. इतिहासात त्यांनी केलेल्या दैदीप्यमान कार्याचा सन्मान म्हणून विर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासह विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त राजपूत संघटन वाशीम जिल्हयाच्या वतीने जिल्हाध्यक्ष आशिष ठाकुर यांच्या नेतृत्वात २६ मे रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
    निवेदनात नमूद केले आहे की, भारताच्या इतिहासात विर शिरोमणी महाराणा प्रताप यांचे कार्य अतुलनिय आहे. देशभक्ती आणि विरता या गुणांनी परिपूर्ण असलेल्या महाराणा प्रतापसिंह यांनी आपल्या भारतभूमिच्या स्वातंत्र्यासााठी आपल्या जिवाचे बलीदान केले आहे. त्यामुळे त्यांचे नाव भारताच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी कोरल्या गेले आहे. असे असले तरी भारतीय लोकशाहीमध्ये इतर महापुरुषांप्रमाणे विर शिरोेमणी महाराणा प्रताप यांच्या कार्याला महत्व दिल्या जात नाही. त्यामुळे येणार्‍या नव्या पिढीला त्यांच्या कार्याचा विसर पडत चाललेला आहे. भारताच्या स्वातंत्र्यांसाठी महाराणा प्रताप यांनी केलेले अतुलनिय साहस आणि योगदानाचा सन्मान म्हणून संपूर्ण भारतातील प्रत्येक जिल्हयामध्ये महाराणा प्रताप यांचे स्मारक उभारण्यात यावे, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांसह शाळा, महाविद्यालयांमध्ये त्यांची जयंती सक्तीने साजरी करण्यासह जयंतीनिमित्त शासकीय सुटी जाहीर करावी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या राजपुत समाजासाठी महाराणा प्रताप यांच्या नावाने आर्थिक महामंडळ स्थापन करा, प्रत्येक शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, निमशासकीय कार्यालयामध्ये महाराणा प्रताप यांची प्रतिमा लावणे सक्तीचे करा आदी मागण्यांची तातडीने पुर्तता करुन महाराणा प्रताप यांच्या कार्याचा सन्मान करण्याची मागणी राजपुत संघटनेच्या वतीने करण्यात आली असून निवेदनावर आशिष ठाकुर, राधेशामसिंह ठाकुर, अजयसिंह ठाकुर, अ‍ॅड. सज्जन चंदेल, मयुर गौर, स्वप्नील ठाकुर, अनुराग ठाकुर, देवेंद्र ठाकुर, सोनाली रघुवंशी, शाम ठाकुर, पवन चौहाण, जगन्नाथ सोळंके आदींच्या सह्या आहेत.