Ticker

6/recent/ticker-posts

वाशीम येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून शरद पाटील रुजू


वाशीम येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून शरद पाटील रुजू
वाशिम : वाशिमचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून शरद पाटील यांनी ४ मे रोजी सूत्रे स्वीकारली. दिनेशश्चंद वानखेडे हे फेब्रुवारी २०२० मध्ये सेवानिवृत्त झाल्यामुळे हे पद रिक्त होते. श्री. पाटील हे पदोन्नतीने येथे रुजू झाले आहेत. यापूर्वी ते अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत होते. श्री. पाटील यांची राज्य सेवा परीक्षेतून सन १९९९ मध्ये उपजिल्हाधिकारीपदी थेट नियुक्ती झाली. परीविक्षा कालावधीत त्यांनी नंदुरबार येथे काम केले. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे उपविभागीय अधिकारी, सरदार सरोवर प्रकल्पात देखील त्यांनी काम केले आहे. अमरावती येथे उपजिल्हाधिकारी (रोहयो), पुणे येथील यशदा संस्थेमध्ये आपत्ती व्यवस्थापन केंद्र व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात संचालक, अकोला येथे उपजिल्हाधिकारी आणि मुंबई येथे राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात सहसंचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.