अनसिंग चेक पोस्टवर स्थलांतरीत मजुरवर्गाला शिक्षकांकडून मदत
वाशीम - तालुक्यातील अनसिंग चेकपोस्टवर शासनाच्या आदेशानुसार आपले कर्तव्य बजावणार्या शिक्षक बांधवांकडून परजिल्ह्यातून पायी स्थलांतर करणार्या मजुरांना खिचडी व बिस्कीटे वाटप करुन माणूसकीचा परिचय देण्यात येत आहे. सोबतच या मजुरांना पिण्याचे पाणी, अन्नधान्य व यथाशक्ती आर्थिक मदत करुन त्यांच्या प्रवासाची वाट सुकर करण्यात येत आहे. अपरिचित व्यक्तींकडून मिळत असलेल्या या मदतीमुळे मजुर वर्गांना दिलासा मिळत आहे.
सध्या सर्व देशभर कोविड-१९ या संसर्गाने हाहाकार माजवला असून याची खबरदारी म्हणून पोलीस प्रशासन, आरोग्य कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत. त्याचबरोबर प्रशासनाने शिक्षकांवर नव्या जबाबदारीची भर टाकत चेकपोस्टवर येणार्या जाणार्या लोकांची नोंद घेण्यासाठी कामास लावले आहे. तालुक्यातील अनसिंग चेकपोस्टवर ड्युटी बजावणारे श्याम जोशी, श्रीकृष्ण कांबळे, प्रभू मोरे, मदन चौधरी व सतत सामाजिक कार्याची आवड असणारे व गरजूंना मदत करण्यासाठी पुढाकार घेणारे शिक्षक समाधान गिर्हे आदी आपल्या कर्तव्यादरम्यान परराज्यातून, परजिल्ह्यातून येणार्या लोकांची विचारपूस करून दिलेल्या नमुन्यात काटेकोरपणे नोंद करत आहेत. यादरम्यान राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीने स्थलांतर करणार्या प्रवाशांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. याचबरोबर पीएसआय दसरे, वानखडे, खंडारे व सर्व पोलीस कर्मचार्यांनी सुद्धा बिस्कीट वाटप करीत माणुसकीचे दर्शन दिले. या मदतीमध्ये डॉ. सुडे, चौधरी, मापारी, सौभागे, गंगावणे, सोनुने यांनी तर पत्रकार प्रांजल जैन, नारायण सातव आदी मोलाचे सहकार्य करत आहेत.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ