Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय बसव ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेला महाराष्ट्र व कर्नाटकमधून उदंड प्रतिसाद : वचन अकादमीचा पुढाकार : महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजन


राष्ट्रीय बसव ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेला महाराष्ट्र व कर्नाटकमधून उदंड प्रतिसाद
वचन अकादमीचा पुढाकार : महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोज
वाशीम - थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्‍वर यांच्या जयंतीनिमित्त वचन अकादमी महाराष्ट्र यांच्या पुढाकारातुन २३ ते ३० एप्रिल दरम्यान आयोजीत राष्ट्रीय बसव ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेला महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातुन स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभला. अनेकांनी या स्पर्धेत हिरीरीने सहभाग घेेत आपल्या वक्तृत्व कलेचे उत्कृष्ट प्रदर्शन घडविले. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. महात्मा बसवेश्वरांच्या वैश्विक विचारांचे संशोधन, प्रचार-प्रसार, लेखन आणि चिंतन करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेनिमित्त विविध पारितोषीके ठेवण्यात आली होती.
 स्पर्धेतील या निकालामध्ये प्रथम पारितोषीक स्वरूप शिवलिंग नागापूरे लातूर, व्दितीय पारितोषीक बसवदीप रविंद्र बेंम्बरे देगलूर व तृतीय पारितोषीक प्रार्थना संगप्पा सोलापूरे भालकी जि. बिदर यांनी पटकावले. तर प्रोत्साहनपर पारितोषीक स्वराज्ञा रूद्राक्षे रायगड या चिमुकलीने मिळविले. चारही स्पर्धकांना अनुक्रमे ५००१, ३००१, २००१, १००१ रुपये व स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. या पारितोषीकांसाठी लिंगैक्य नागोराव रामजी टपरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रा. गिरीश टपरे वर्धा, लिंगैक्य बाबुराव ईरप्पा पटणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ शिवकुमार गाजले पुणे,  लिंगैक्य प्रा.सुभाष घोडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रा. हरीश घोडेकर, वाशिम व प्रा. जवाहर चनशेट्टी, लातूर यांनी प्रायोजकत्व स्विकारले होते.
 याशिवाय ऐश्वर्या आलेगावी (इक्कल जि. बागलकोट), आदिती चाकोते (शिरूर आनंतपाळ), श्रावणी नंदू बिचेवार (विडूळ), गार्गी नलेगावकर (अहमदपूर), श्रेया रुद्रेश (कित्तूर जिल्हा विजापूर), अपूर्वा संजय निकाडे (कारंजा लाड), अभिषेक अरुण कनजे (पुणे), चेन्नमयी होसुर (धारवाड), मधुश्री शिवहार रावले (वसमत), इरफान मुल्ला (बरवड जि. बेळगाव), वैष्षवी घनघोरकर (अमरावती) या समान गुणवता धारक स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षीसे देण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्र व कर्नाटकातील मराठी, इंग्रजी,कन्नड भाषेतील स्पर्धकांनी एकूण साठ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून एकापेक्षा एक सरस असे सादरीकरण केले.
 स्पर्धेचे  परीक्षण प्रा. भीमराव पाटील लातूर, प्रा. डॉ. नलिनी वाघमारे पुणे, श्री बसवराज कनजे पुणे व बाळासाहेब पाटील कोल्हापूर यांनी  केले. स्पर्धेचे मुख्य संयोजक म्हणून प्रा. सचितानंद बिचेवार, राजुभाऊ जुबरे, सौ. सविताताई नडकटी, सोशल मिडिया प्रमुख म्हणून अभिषेक देशमाने, गणेश वैद्य, नरेश कुरेकर, संदीप पिंपळकर तर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रा. संतोष गाजले, प्रा. जवाहर चेनशेट्टी, प्रा.  रत्नाकर लक्षट्टे, चंद्रकांत खोचरे आदींनी  परिश्रम घेतले.