आरोग्य विभागातील सर्व कंत्राटी कर्मचार्यांचे शासकीय सेवेत समायोजन करा
विविध मागण्यांसाठी नर्सेस असोसिएशनचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
वाशीम - गेल्या १५ वर्षापासून कंत्राटी पध्दतीने कमी मानधनावर आरोग्य विभागात कार्यरत डॉक्टर्स, नर्स, कारकुन, सफाई कामगार आदींना समान काम, समान वेतन या धोरणानुसार सरळसेवा भरतीव्दारे शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी व इतर विविध मागण्यांसाठी नर्सेस असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. कु. माया वाठोरे यांच्या वतीने १ मे रोजी मुख्यमंत्र्यांना ई-मेलव्दारे निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, राज्यात सन २००५ पासून आरोग्य विभागामध्ये डॉक्टर्स, नर्स, कारकुन, सफाई कामगार इत्यादी कंत्राटी कर्मचारी कार्यरत असून या कंत्राटी कर्मचार्यांना कमी मानधनात पूर्ण वेळ काम करावे लागते. या कालावधीत आरोग्य विभागाने या कंत्राटी कर्मचार्यांना कायम करुन घेतले नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या समान काम, समान वेतन या निर्देशाचा या कंत्राटी कर्मचार्यांबाबत सहानुभुतीपूर्वक विचार करण्यात यावा. यासोबतच सरळसेवा भरतीमध्ये कंत्राटी कर्मचार्यांना आरक्षण देण्यात यावे. त्यांच्या वयाची अट शिथील करावी. कंत्राटी कर्मचार्यांना वर्षाच्या अनुभवाप्रमाणे गुण देवून त्यांना सरळ सेवेत समायोजन करावे. यासोबतच केरोनासारख्या भिषण महामारीच्या संसर्गजन्य आजारामध्ये सर्वोेेतोपरी सेवा देणार्या कर्मचार्यांना शासनाने तात्काळ सरळ सेवेमार्फत शासकीय सेवेत सामावून घ्यावे. शासनाने या मागण्यांचा सहानुभुतीपुर्वक विचार न केल्यास संघटनेला पुढील काळात संविधानात्मक पध्दतीने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असेही डॉ. वाठोरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ