काटा येथे दोन गोठ्याला भिषण आग लागुन शेतीपयोगी साहित्य जळून खाक
वाशीमच्या अग्नीशमन दलाला पाचारण
शेतकरी निंबलवार व घंटे यांचे १ लाख ३० हजाराचे नुकसान
वाशीम - तालुक्यातील मौजे काटा येथील शेतकरी निंबलवार व घंटे यांच्या गट नं. २२२ मध्ये असलेल्या शेतातील दोन गोठ्यास ४ मेे च्या सकाळी साडेसात वाजता अचानक भिषण आग लागुन गोठ्यात ठेवलेले शेतीपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या घटनेत दोन्ही शेतकर्यांचे १ लाख ३० हजाराचे नुकसान झाले. आगीचे कारण समजू शकले नाही.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील ग्राम काटा येथे ४ एप्रिलच्या सकाळी साडेसातच्या दरम्यान गट नं. २२२ मधील शेतकरी महादेव निंबलवार यांच्या शेतातील गोठयास अचानक आग लागली. सकाळची वेळ असल्यामुळे ही बाब गावकर्यांच्या लक्षात आली नाही. ही आग पसरत पसरत लगत असलेल्या श्रीमती गोदावरी घंटे या शेतकर्याच्या जवळच असलेंल्या गोठ्यापर्यत पसरली. दरम्यान शेतामधुन मोठ्या प्रमाणात धुर निघत असल्याचे लक्षात येताच शेतकरी शेतात धावले. यावेळी वाशीम नगर परिषदेच्या अग्नीशमन विभागाला फोन करुन अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाच्या कर्मचार्यांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यत शेतकरी निंबलवार व घंटे यांच्या दोन्ही गोठ्यातील खताचे पोते, फवारणी औषधे, टिनपत्रे, कुटार व शेती अवजारे आदी शेतीउपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. माहिती मिळताच तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला. या आगीत दोन्ही शेतकर्यांचे तब्बल १ लाख ३० हजाराचे नुकसान झाले आहे. मात्र आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ