Ticker

6/recent/ticker-posts

कावररखे मल्टीस्पेशालीटी डेन्टल हॉस्पीटलच्या वर्षपुर्तीनिमित्त विविध सामाजीक उपक्रमांना प्रारंभ : दिव्यांगाना मोफत उपचार तर जेष्ठांना विशेष सवलत


कावररखे मल्टीस्पेशालीटी डेन्टल हॉस्पीटलच्या वर्षपुर्तीनिमित्त विविध सामाजीक उपक्रमांना प्रारंभ
दिव्यांगाना मोफत उपचार तर जेष्ठांना विशेष सवलत
परिवारासाठी लाईफटाईम सवलत कार्ड नोंदणीस सुरुवात
लॉकडाऊनमध्ये २४ तास अतिआवश्यक सेवा : फोनव्दारे रुग्णांना तत्पर उपचार सल्ला
वाशीम - एक वर्षाआधी १ मे महाराष्ट्र दिनी शहरात सुरु झालेल्या कावरखे डेंटल केअर अ‍ॅन्ड इम्प्लांट सेंटर मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटलने सर्वोत्तम सेवेचा उच्चांक नोंदवून आज, १ मे रोजी वर्षपुर्तीचे आव्हान यशस्वीरित्या स्विकारुन दुसर्‍या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त सामाजीक जाणीवेचे भान ठेवून हॉस्पीटल प्रशासन आणि आरोही सामाजीक विकास प्रतिष्ठानच्या संयुक्त सहकार्यातून पुढील एक वर्षात आपल्या वैद्यकिय सेवेच्या माध्यमातून रुग्णांसाठी विविध सामाजीक उपक्रमांचा बिगुल वाजविण्यात आला असल्याची माहिती हॉस्पीटलचे प्रमुख डॉ. किशोर संजय कावरखे यांनी दिली.
 आपल्या रुग्णांप्रती केवळ व्यवसायीक दृष्टीकोन न ठेवता सामाजीक सहवेदनांचे भान ठेवून हॉस्पीटलच्या वतीने प्रथम वर्धापन दिनानिमित्त रुग्णांसाठी विविध कार्यक्रम व योजना कार्यान्वीत करण्यात आल्या आहेत. पुढील एक वर्षामध्ये हॉस्पीटलच्या पुढाकारातुन तसेच शासन, प्रशासन आणि सामाजीक संस्थांच्या सहकार्यातून जिल्हयातील विविध दुर्गम गावांमध्ये, आदिवासी पाड्यांमध्ये मोफत दंत व मुखरोग तपासणी शिबीरे घेतल्या जातील. दंतरोगाबद्दल विविध समज, गैरसमज, अंधश्रध्दा दुर करुन विशेष करुन ग्रामीण भागातील लोकांमध्ये दातांचे आरोग्य जपण्याबाबत वर्षभर जनजागृती केल्या जाईल. यातीलच एक पाऊल म्हणून वर्षभर दिव्यांगांना मोफत तपासणी व उपचारासह जेष्ठ नागरीकांना उपचारामध्ये विशेष सवलत देण्यात येईल. यासोबतच कावरखे हॉस्पीटलचा नाविण्यपूर्ण व जिल्हयातील पहिला उपक्रम म्हणून ४ सदस्यांच्या संपुर्ण परिवारासाठी लाईफटाईम सवलत कार्डाच्या नोंदणीस आजपासून प्रारंभ करण्यात आला आहे. या कार्डाव्दारे परिवारातील कोणताही सदस्याला वर्षभर दंत व मुखरोग उपचारातील फी मध्ये विशेष सवलत देण्यात येईल. सदरची नोंदणी प्रत्यक्ष हॉस्पीटलमध्ये, ई-मेल वर किंवा ८१०४१७८०८३ या व्हॉटसअप क्रमांकावर करता येईल. यासोबतच सध्याच्या लॉकडाऊन काळातही हॉस्पीटलची सेवा २४ तास सुरु असून दंतरोग संबंधीत कोणताही त्रास असल्यास अशा रुग्णांना फोनवरुन विशेष सल्ला व मार्गदर्शन करण्याची सुविधा कार्यरत असल्याची माहिती डॉ. किशोर कावरखे यांनी दिली.
 सध्या कोरोना या विषाणूपासून होणारा कोविड-१९ हा आजार एकमेकांच्या संपर्कातुन व श्‍वसनाव्दारे होत आहे. या पार्श्‍वभूमिवर दंत व मुखरोग संबंधी उपचार करणार्‍या डॉक्टरांना ‘हायरिस्क’ चे दडपण डोक्यावर घेवून रुग्णांवर उपचार करावा लागतो. दंत व मुखरोगासंबंधीत उपचारामुळे रुग्ण व डॉक्टरांचा थेट संपर्क येत असला तरी दंतरोग डॉक्टर्स आपल्या जीवाची पर्वा न करता सामाजीक दृष्टीकोन ठेवून रुग्णांवर उपचार करत आहेत. परंतु शासनाच्या वतीने अशा डॉक्टरांना कोविडच्या सुरक्षीतेतुन कोणतेही पीपीई किट व मास्क पुरविल्या गेले नसल्याची खंत यावेळी डॉ. कावरखे यांनी बोलून दाखविली. करोना पिडीत रुग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांप्रमाणेच दंत व मुखरोग तज्ञ डॉक्टरांना सुध्दा शासनाने आरोग्यकवच देण्याची गरज असल्याचे मतही डॉ. कावरखे यांनी व्यक्त केले.
 अत्याधुनिक मशीन व तंत्राव्दारे वेदनारहीत दंत उपचारासाठी प्रख्यात असलेले डॉ. किशोर संजय कावरखे (बी.डी.एस. मुंबई) यांच्या कावरखे डेंटल केअर अ‍ॅन्ड इम्प्लांट सेंटर मल्टीस्पेशालीटी सेंटरमध्ये दंतरुग्णांसाठी अत्याधुनिक मशीन व तंत्राव्दारे दंतोपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधांमध्ये दातांमधील किड काढून चांदी व सिमेट भरणे, दातंावरील पिवळेपणा नाहीसा करणे, दातांच्या नसेचा इलाज करणे, वेडेवाकडे दात सरळ करणे, क्लेशकारक दात काढणे, कृत्रिम दंतरोपण करणे, दातांवर कॅप बसविणे, दातांमध्ये असणार्‍या फटी भरुन काढणे, सौदर्यवर्धक दातांच्या ट्रिटमेंट करणे, सिंगल सिंटीग रुट कॅनल ट्रिटमेंट, हिरड्यावरील आजारावर उपचार, मुख कर्करोगाचे निदान, हलणार्‍या दातांवर उपचार, संपुर्ण किंवा अर्ध कवळी बसविणे, लहान मुलांच्या दातांवरील उपचार, दातांच्या उघड्या पडलेल्या मुळावर उपचार, अपघातामध्ये तुटलेल्या दातांवर उपचार, हिरड्यावरील काळेपणा व सुज कमी करणे, मुखामधुन येणारी दुर्गंधी आणि रक्त यावर उपचार, ओठामधील भेग, टाळुवर असणारी भेग, जबड्यांच्या हाडांचे झालेले फ्रॅक्चर यावर उपचार, फेशियल प्रोफाईल सुधारणे आदी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच विशेष प्रसंगी रुग्णांचे उपचार आणि मार्गदर्शनासाठी वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांच्या भेटी हॉस्पीटलला राहतील. दातांच्या वेदनांनी आजघडीला अनेकजण पिडीत आहेत. अशा रुग्णांच्या वेदनांचा अंत करुन त्यांचे जीवन आनंदमयी करण्यासाठी जिल्हयाचे मुख्यालय असलेल्या वाशीम शहरात कावरखे डेंटल हॉस्पीटलच्या रुपाने कमीत कमी पैशामध्ये सर्वोेत्तम सुविधा मिळाल्याचे मत या हॉस्पीटलमध्ये यशस्वी उपचार झालेल्या अनेक रुग्णांनी व्यक्त केले आहे.