Ticker

6/recent/ticker-posts

आम्ही घरीच राहून कोरोनाला हरवू : ग्राम लोहारा येथे एमव्हीएसटीएफच्या वतीने जनजागृती


आम्ही घरीच राहून कोरोनाला हरवू
ग्राम लोहारा येथे एमव्हीएसटीएफच्या वतीने जनजागृती
कारंजा - कोरोनाचा संसर्ग जनतेमध्ये वाढू नये यासाठी लॉकडाऊन काळात नागरीकांनी घरीच राहून आपला बचाव करावा यासाठी महाराष्ट्र ग्राम परिवर्तन अभियान व पंचायत समितीच्या वतीने एमव्हीएसटीएफ मध्ये समाविष्ट तालुक्यातील ग्राम लोहारा/किसाननगर येथे कोविड-१९ जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानात ग्राम परिवर्तक रंजीत वळवी यांनी सहभाग घेतला.
 या जनजागृती अभियानात ग्राम परिवर्तन अभियान रंजीत वळवी यांनी ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे खंडारे सर यांच्या मार्गदर्शनात लाऊडस्पिकरव्दारे ‘आम्ही घरीच राहून कोरोनाला हरवु’ हा संदेश देवून जनजागृती केली. तसेच कोरोना आजारापासून संरक्षणासाठी नियमित मास्क वापरा, सैनिटायझरचा वापर करा, विनाकारण घराबाहेर पडू नका, घरीच राहून आपल्या व आपल्या परिवारातील जेष्ठांची काळजी घ्या असा संदेश या जनजागृती अभियानाव्दारे देण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभगाचे खंडारे, ग्रा.पं. सदस्य गजानन बासोळे, स्वच्छताग्रही अशोक रसाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.