माणूसकीधर्माच्या मंदिरावर कतर्व्यपुर्तीचा कळस
काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष डॉ. सोमटकर यांच्या प्रयत्नाने बेलापूर येथील मजुरांची उपासमार थांबली
वाशीम - लॉकडाऊन काळात नवी मुंबई भागातील बेलापुर येथे अडकून पडलेल्या वाशीम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील काही मजुरांची उपासमार वाशीम जिल्हा काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल सोमटकर यांच्या प्रयत्नामुळे थांबली. डॉ. सोमटकर यांनी या मजुरांच्या उपासमारीबाबत काँग्रेसच्या कोकण विभागाशी संपर्क साधून माहिती दिल्यानंतर उल्हासनगर जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने या मजुरांना त्वरीत मोफत धान्यवाटप व आर्थीक मदत देण्यात आली.
कोरोना महामारीचा संसर्ग संपुष्टात यावा यासाठी भारत सरकारच्या वतीने २३ मार्चपासून संपुर्ण देश लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या लॉकडाऊनच्या तिसर्या टप्प्यात ४ मे पासून १७ मे पर्यत संचारबंदीचा तिसरा टप्पा सुरु आहे. या तिसर्या टप्प्यामध्ये भारतातील अनेक राज्यातील जिल्हयांमध्ये करोना महामारी आटोक्यात आली असली तरी संसर्गातून रुग्णांची संख्या वाढत आहे. तर अनेक जिल्हयामध्ये हा संसर्ग शुन्यावर आहे. लॉकडाऊनच्या या काळात सर्वसामान्य जनता घरी असली तरी एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्हयात व एका राज्यातुन दुसर्या राज्यात पोटापाण्यासाठी स्थलांतर करुन काम करणार्या मजुरांची मोठी परवड होत आहे. हाताला काम नाही, राहायला निवारा नाही, खिशात पैसा नाही अशा परिस्थितीत हजारो कुटुंबांची उपासमार होत आहे. या कठीण परिस्थितीमध्ये राज्यातील व राज्याबाहेरील अशा मजुरांना उपासमारीतुन सोडविण्यासाठी राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व सेल, सर्व विभाग व सर्व शाखा पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत. अनेक जिल्ह्यात अडकलेल्या मजुरांची माहिती घेवून पदाधिकारी त्या त्या विभागाच्या पदाधिकार्यांशी संपर्क साधून अशा मजुरांना मदत करण्यासाठी सहकार्य करीत आहेत. तर मिळालेल्या माहितीवरुन काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तातडीने विविध ठिकाणी जावून मजुरांना धान्य वाटप व आर्थीक मदत करीत आहेत. काँग्रेस पक्षाच्या या अथक परिश्रमातुन तातडीच्या वेळेस मिळालेल्या मदतीमुळे अनेक मजुरांची उपासमार थांबली आहे. वेळेवर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांनी आपल्या कर्तव्याला जागुन केलेल्या एका मदतीमुळे लॉकडाऊन काळात अडकलेल्या मजुरांना वेळेवर मदत मिळून त्यांची उपासमार थांबली आहे.
या घटनेची माहिती अशी की, वाशीम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील काही मजुर नवी मुंबईतील बेलापूर येथे कामानिमित्त गेले होते. त्यानंतर भारतात लॉकडाऊन घोषीत झाल्यामुळे हे मजूर बेलापूर येथेच अडकले होते. काही दिवसापासून हाताला काम नसल्यामुळे या मजुरांची परिस्थिती अत्यंत नाजूक बनली होती. यातील काही मजुरांनी वाशीम जिल्हा काँग्रेस सेवादलचे जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल सोमटकर यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांना आपली व्यथा कळविली व मदत करण्याची विनंती केली. मजुरांच्या होत असलेल्या उपासमारीची माहिती कळताच डॉ. सोमटकर यांनी तातडीने कॉग्रेसच्या कोकण विभागाचे निरिक्षक प्रकाश पेवेकर यांच्याशी संपर्क साधून मजुरांची व्यथा कळविली. त्यानंतर प्रकाश पेवेकर यांनी त्वरीत उल्हासनगर जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या पदाधिकार्यांच्या सहकार्यातून या मजुरांना मोफत धान्य वाटप केले. सोबतच आर्थिक मदतही केली. या मदतीध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलासराव औताडे, मंगलसिंग सोलंकी, प्रकाश पेवेकर, मनिष नेमाडे व शंकर अहूजा यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. तातडीने मिळालेल्या या मदतीबद्दल डॉ. सोमटकर यांनी या सर्वाचे आभार मानले आहेत. लॉकडाऊन काळात अती तातडीच्या काळात केवळ एका फोनवरुन त्वरीत हालचाल करुन या मजुरांना मदत पोहचविण्यात महत्वाची भूमिका पार पाडल्यामुळे वाशीम जिल्हा काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल सोमटकर यांनी खर्या अर्थाने माणूसकी धर्माच्या मंदिरावर आपल्या कर्तव्याचा सोनेरी कळस चढविला आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ