लॉकडाऊनमुळे मंडप व्यावसायीकांसह डेकोरेटर्स, कॅटरींग, लाईटींग, साऊंड व मंगल कार्यालयांचा व्यवसाय ठप्प : शासकीय मदतीची गरज
वाशिम : जगाच्या अर्थव्यवस्थेला थेट मरणशय्येवर पोहोचविणार्या कोरोना संकटाचा विविध नागरी व व्यवसायीक क्षेत्रांसह मंडप, डेकोरेटर्स, कॅटरींग, लाईटींग, साऊंड व मंगल कार्यालये आदी व्यवसायांना जबर फटका बसला आहे़ लाँकडाऊनमुळे मार्च महिन्यापासूनच लग्नसोहळ्यांवर बंदी आल्यामुळे सिझनमध्ये वर्षभराचे आर्थिक गणित जुळविणार्या या व्यवसायाचे आर्थिक नियोजनही कोलमलडले आहे़ आता देणेकर्यांची देणी, कर्जहप्ते, मेंटनन्स, इलेक्ट्रीक बिल, मजुरांचे पगार कसे चुकवावे या विवंचनेत व्यवसायीक असून शासनाने याकडे सहानुभुतीच्या दृष्टीने पाहून या व्यवसायीकांना शासनाने आर्थिक मदतीच्या रुपाने आधार द्यावा अशी मागणी पुढे येत आहे.
दरवर्षी मार्च महिन्यापासून सुरु होणारी लग्नसराई त्यासोबतच यात्रा व इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन ते तीन महिन्याच्या होणार्या कमाईतुन पुर्ण वर्षाचा खर्च, मजुरांचा पगार, कर्ज परतफेडीचे हप्ते याचे बजेट या व्यवसायीकांना लावावे लागते. यंदा मात्र कोरोना संकटामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे ऐन लग्नसराईच्या सिझन मध्ये व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत़ परिणामी, सदर व्यावसायीकांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले असून वर्षभर व्यवहारांचे चक्र्र चालवावे कसे या चिंतेने त्यांना ग्रासले आहे़ शासनाने मार्च, एप्रिल व मे महिन्याच्या कर्जाचे हप्ते पुढे ढकलेले आहेत़ परंतु, या व्यावसायींकांना तर या तिन महिन्यात झालेल्या कमाईवरच वर्षभराच्या हप्त्यांची तजविज करून ठेवावी लागते़ मात्र, कमाईच बुडाल्यामुळे हप्ते चुकवावे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे़. त्युळे या व्यावसीयाकांना आता खर्या अर्थाने शासनाच्या आधाराची गरज निर्माण झाली आहे़ परिस्थितीत सुधारणा न झाल्यास हा व्यवसाय पूर्णपणे डबघाईस येण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे शासनाने या व्यावसायीकांना आर्थिक पँकेज, कर्ज हप्त्यांमध्ये सवलत, जीएसटी, विजदेयकांमध्ये सुट आदी सवलती देण्याची मागणी या व्यावसायीकांमधून पुढे येत आहे़
शासनाने मदतीचा आधार द्यावा - संतोष शिंदे
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या लाँकडाऊन व संचारबंदीमुळे लग्नसमारंभ पूर्णपणे बंद आहेत़ याचा फटका आम्हा व्यावसायीकांना बसला असून आमचे वर्षभराचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे़ लग्नसराईच्या चार महिन्यात होणार्या उत्पन्नावर आमचे वर्षभराचे आर्थिक बजेट अवलंबून असते़ कामगारांचे पगार, कर्जाचे हप्ते, जीएसटी, इलेक्ट्रीक बिल, मेंटनंस आदी वर्षाचे यातून भागावावे लागतात़ यंदा मात्र उत्पन्नच बुडाल्यामुळे आमच्या समोर समस्यांचा मोठा डोंगर उभा झाला आहे़ अशा संकटप्रसंगी शासनाने सहानुभुतीच्या दृष्टीकोनातून या व्यवसायीकांना मदतीचा आधार द्यावा अशी मागणी ओम मंडप अँण्ड डेकोरेटर्स संचालक संतोष शिंदे यांनी केली आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ