कारंजा ग्रामीण पोलीसांची दंडेलशाही : पुण्यनगरीचे पत्रकार देशपांडे यांना मारहाण : गृहमंत्र्यांकडून गंभीर दखल, कारवाईचे संकेत?
वाशीम - लॉकडाऊन काळात एकीकडे वाशीम जिल्हयात कठोर पोलीस बंदोबस्त राबविण्यात येत आहे तर दुसरीकडे अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्या नागरीकांना व प्रसारमाध्यमातील घटकांना पोलीसांकडून विचारपूस न करता मारहाणीचे प्रकारही घडत आहेत. वाशीममध्ये काही पत्रकारांसोबत पोलीसांकडून अरेरावीच्या व दंडेलशाहीच्या घटना घडल्यानंतर कारंजातही पोलीसांकडून पत्रकाराला मारहाणीचा गंभीर प्रकार आज (दि.21) रोजी घडला असून या घटनेचे पडसाद संपुर्ण जिल्हयात उमटले आहेत. जिल्हयातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती अशी की, कारंजा येथील दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी सुधीर देशपांडे (वय 55) व सोबत त्यांचा पुतण्या हे दोघे 21 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता दुचाकीने शेतात फवारणीसाठी जात असतांना गंगापुर फाट्याजवळ कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरिक्षक वाघमोडे, शिपाई नितीन ठाकरे व संतोष इंगळे यांनी देशपांडे यांना अडवून मारहाण केली. या मारहाणीत देशपांडे यांच्या पाठीवर व पायावर काठीचे वळ उमटले. शिवाय त्यांच्यासोबत असलेल्या अल्पवयीन पुतण्याला सुध्दा मारहाण करुन या दोघांना चोरासारखे पोलीस वाहनातुन पोलीस स्टेशनमध्ये आणले. ही घटना जेथे घडली ती हद्द ग्रामीण पोलीसांची नसुन शहर पोलीसांची आहे. मात्र ग्रामीण पोलीसांकडून चिरीमिरी मिळविण्याच्या उद्देशाने सामान्य नागरीकांना धमकावल्या जात असल्याचा आरोप पत्रकारांनी केला आहे.
दरम्यान पोलीस व प्रशासनाच्या चांगल्या बातम्या आपला जीव धोक्यात घालून जनतेपर्यत पोहचविणार्या प्रसारमाध्यमातील एका जबाबदार घटकाला व लोकशाहीच्या चौथा आधारस्तंभ असलेल्या एका पत्रकाराला खुद्द पोलीसांकडून मारहाण करण्यात आल्याच्या निंद्य घटनेचे तीव्र पडसाद जिल्हयातील पत्रकार वर्तुृळात उमटले आहेत. कारंजातील सर्व पत्रकार बांधवांनी ग्रामीण पोलीसांच्या या दंडेलशाहीचा तीव्र निषेध नोंदवून संबंधीत पोलीस अधिकारी व कर्मचार्यांविरुध्द कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार आणि शहर व ग्रामीणच्या ठाणेदारांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे. पत्रकाराला मारहाण करण्याची ही घटना म्हणजे लॉकडाऊनमध्ये प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार आहे. दरम्यान उपविभागीय अधिकारी संजय पाटील व तहसिलदार धिरज मांजरे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनमधुन या घटनेची माहिती जाणून घेतली. कारंजा ग्रामीण पोलीसांनी पत्रकाराला केलेल्या मारहाणीची माहिती गृहमंत्र्यांपर्यत गेली असून लवकरच संबंधीत पोलीस अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान या घटनेचा जिल्हयातील विविध पत्रकार संघटनांकडून तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ