Ticker

6/recent/ticker-posts

पुरवठा विभागाची वाशिम जिल्ह्यातील आठ रेशन दुकानांवर कारवाई : संबंधीत अधिकारी मोबाईल क्रमांक व हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध


पुरवठा विभागाची वाशिम जिल्ह्यातील आठ रेशन दुकानांवर कारवाई : संबंधीत अधिकारी मोबाईल क्रमांक व हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध
वाशिम, दि. 13 (जिमाका) : कोरोनाचा संसर्ग वाढु नये यासाठी जिल्ह्यात लागु केलेल्या संचारबंदीच्या संवेदनशील परिस्थितीत जिल्हयातील काही रेशन दुकानदारांनी शासन निणमाचे उल्लंघन केल्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री राजेंद्र जाधव यांनी नियमाचे उल्लंघन करणार्‍या एकूण आठ रेशन दुकानदानांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. झालेल्या कारवाईमध्ये एका महिला बचतगटाव्दारा संचालीत रेशन दुकान व तीन वैयक्तीक संचालीत रेशन दुकानांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तर एक महिला बचतगट व तीन वैयक्तीक संचालीत रेशन दुकानांच्या प्राधिकारपत्राची अनामत रक्कम जप्त करुन त्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. ही कारवाई संबंधीत तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या रास्तभाव दुकानांच्या तपासणी अहवालावरून करण्यात आली आहे.
 परवाना निलंबित केलेल्या रेशन दुकानांमध्ये मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील के. के. भुतडा, किन्हीराजा येथील प्रजापिता महिला बचत गट, अनसिंग येथील जी. टी. घुगे व कारंजा तालुक्यातील बेलखेड येथील शरद वानखडे यांच्या रेशन दुकानांचा समावेश आहे. तर प्राधिकारपत्राची अनामत रक्कम जप्त झालेल्यांमध्ये मालेगाव तालुक्यातील एरंडा येथील के. बी. घुगे, गोकसावंगी येथील भाग्यलक्ष्मी महिला बचत गट, हनवतखेडा येथील गजानन राऊत व रिसोड तालुक्यातील भापूर येथील विजय बोडखे यांच्या रेशन दुकानांचा समावेश आहे.
 नोवेल कोरोना विषाणूच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा योग्य दरात होणे आवश्यक आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत रास्तभाव दुकानदारांनी अत्यंत दक्षपणे काम करणे अपेक्षित असताना काही रास्तभाव दुकानदार हे शासन नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून आले आहे. झालेल्या कारवाईमुळे जिल्हयातील इतर रेशन दुकानदारांमध्ये खळबळ उडाली असून रेशन ग्राहकांमध्ये या कारवाईप्रती समाधान व्यक्त केल्या जात आहे.
दरम्यान अन्नधान्य वितरणविषयी तक्रार असल्यास संबंधीत तालुक्याशी संबंधीत अधिकार्‍यांना खालील क्रमांकावर व हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
राजेंद्र जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी- 9975301133
विजय साळवे, तहसीलदार, वाशिम- 8275399586
रवी काळे, तहसीलदार, मालेगाव- 9145545419
अजित शेलार, तहसीलदार, रिसोड- 9881759591
किशोर बागडे, तहसीलदार, मंगरूळपीर- 9921077390
धीरज मांजरे, तहसीलदार, कारंजा लाड- 8805057858
डॉ. सुनील चव्हाण, तहसीलदार, मानोरा- 7798538829
रेशनिंगविषयी तक्रार आणि माहितीसाठी नि:शुल्क हेल्पलाईन
1800224950 किंवा 1967
राज्यस्तरीय हेल्पलाईन क्रमांक
1800 22 4950/1967 (नि:शुल्क) 
022- 23720582 / 23722970 / 23722483
ईमेल- helpline.mhpdsgov.in
ऑनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी mahafood.gov.in