सरपंच व ग्रामस्तरीय समितीच्या कार्याचा जिल्हा प्रशासनाला अभिमान : सर्व सरपंचांना पत्र : गावाच्या सुरक्षेसाठी वेळप्रसंगी कठोर भूमिका घ्या - जिल्हाधिकारी
वाशीम - जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यात महत्वाचा सहभाग असलेले सरपंच व ग्रामस्तरीय समितीच्या कार्याचे जिल्हाधिकारी श्री ह्षीकेश मोडक यांनी आज, (२८ एप्रिल) सरपंचांना पाठविलेल्या पत्रातून कौतूक करीत या कार्याचा जिल्हा प्रशासनाला अभिमान असल्याचे नमूद केले. यासोबतच गावातील दिव्यांग, वृद्ध, निराधार व्यक्तींची काळजी घेण्याचे आवाहन करीत ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी वेळप्रसंगी कठोर भूमिका घेवून अधिक दक्ष व सावध राहून जिल्हा कोरोनामुक्त ठेवू असेही नमूद केले आहे.
सरपंचांना पाठविलेल्या पत्रात जिल्हाधिकार्यांनी सरपंच व ग्रामस्तरीय समितींना विविध निर्देश दिले आहेत. येणार्या काळातही आणखी दक्ष राहून बाहेर जिल्ह्यातून, मुंबई, पुणे सारख्या महानगरातून व परराज्यातून येणार्या व्यक्तींवर विशेष लक्ष केंद्रित करून अशा व्यक्तींना आवश्यकतेनुसार जिल्हा परिषद शाळेमध्ये ठेवणे, त्यांना लेखी नोटीस बजाविणे, होम क्वारंटाईन’ करून ठेवणे या बाबींची अंमलबजावणी वेळेवर होणे आवश्यक आहे. यासाठी आपणाला अडचणींचा सामना करावा लागत असेल यात शंका नाही. परंतु, आपल्या नेतृत्वात गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काही वेळा कठोर भूमिका ही घ्यावी लागणार आहे. ज्या व्यक्ती होम क्वारंटाईन’ किंवा जिल्हा परिषद शाळेमध्ये क्वारंटाईन’ राहणार नाहीत, अशा व्यक्तींची नावे तातडीने संबंधित तहसीलदार व पोलीस विभागाला कळविणे आवश्यक आहे. ही कार्यवाही वेळेत न झाल्यास अथवा दुर्लक्षित राहिल्यास गावामध्ये संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाशिम जिल्ह्याच्या आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित व्यक्तींची संख्या दोन अंकी झाली आहे. या विषाणूचा संसर्ग आपल्या जिल्ह्यात होवू नये, यासाठी अधिक दक्ष राहून ग्राम पातळीवर चेकपोस्ट लावणे, बाहेरून येणार्या व्यक्तींना क्वारंटाईन’ करणे, उपद्रव करणार्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करणे, प्रसंगी काही लोकांना संस्थात्मक विलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन) कक्षात पाठविणे अशी कारवाई आपल्या स्तरावरून ग्राम समितीमार्फत करावी. जेणेकरून आपले गाव व पर्यायाने आपला जिल्हा कोरोना विषाणूपासून मुक्त राहू शकेल. खोकला, ताप, श्वसनाचा त्रास असलेल्या व्यक्तींना नजीकच्या फिव्हर क्लिनिक येथे तातडीने पाठविणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकार्यांनी नमूद केले आहे.
वृद्ध, निराधार, आजारी व्यक्तींची काळजी घ्या
गावातील वृद्ध, निराधार व्यक्तींवर विशेष लक्ष द्यावे. अन्नधान्य पुरवठा सुरळीत सुरु असल्याची खात्री करावी. याशिवाय इतर आजार असलेल्या व्यक्तींनाही वैद्यकीय सेवा मिळत आहेत किंवा कसे याचीही खात्री करण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी सर्व सरपंचांना सूचित केले आहे. तसेच परजिल्ह्यातून, परराज्यातून आलेल्या व्यक्तींचा तपशील, तातडीच्या प्रकरणी आजारी व्यक्तींची माहिती ८३७९९२९४१५ या क्रमांकावर नोंदवावी अथवा व्हाटसअप मेसेजद्वारे कळवावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी केले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ