शासनाच्या आदेशानुसार समाजबांधवांनी भगवान परशुराम जयंती घरीच साजरी करा
सामाजीक बांधीलकी जोपासून गोरगरीबांना मदत करण्याचे आवाहन
वाशिम : भारतावर कोरोनाच्या रुपाने मोठे संकट पसरले असून या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे समाजबांधवांनी शनिवार, 25 एप्रिल रोजी भगवान परशुराम जयंती आपआपल्या घरीच पुजाअर्चना करुन साजरी करण्यासह सामाजीक बांधीलकी जोपासून गोरगरीब गरजु परिवारांना मदत करण्याचे आवाहन परशुराम युवा बहुभाषिक सामाजीक संघटनेसह विविध सामाजीक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
भगवान परशुराम जयंतीनिमित्त विविध सामाजीक संघटनांच्या संयुक्त आयोजनातुन दरवर्षी स्थानिक मध्यमेश्वर संस्थान येथे कार्यक्रम, शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. मात्र यावर्षी कोरोना विषाणूच्या रुपाने भारतावर फार मोठे संकट उभे राहीले असून ही महामारी सामाजीक संसर्गातून साखळीव्दारे पसरते. मुंबई, पुण्यामध्ये करोना आजाराचे अनेक रुग्ण सापडले असून त्या मानाने वाशीम जिल्हा हा सुदैवी आहे. जिल्हाधिकारी ह्षीकेश मोडक व जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांच्या कणखर धोरणामुळे जिल्हयात एकही नविन करोना रुग्ण सापडला नसून प्रशासनाने केलेल्या आवाहनाला जनतेने योग्य प्रतिसाद देवून लॉकडाऊनच्या पुरेपुर नियमाचे पालन केल्यामुळेच आज वाशीम जिल्हा ग्रीन झोनमध्ये आला आहे. यापुढेही कायदा व सुव्यवस्था तसेच प्रशासनाच्या नियमाचे पुरेपुर पालन करुन समाजबांधवांनी आपआपल्या घरीच सुरक्षीत राहून व कुठेही गर्दी न करता भगवान परशुराम जयंती पुजाअर्चना करुन घरीच साजरी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच या संकटकाळात सामाजीक बांधीलकी जोपासून समाजबांधवांनी गोरगरीब व गरजु परिवारांना मदत करण्याचे आवाहन परशुराम युवा बहुभाषिक सामाजीक संघटना, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, पाराशर ब्राम्हण संघ, परशुराम युवा मंच व विश्व मांगल्य सभा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ