हिंगोली जिल्हयात कोरोना संकट वाढले : कोरोना रुग्णांची संख्या १४ वर : १२ जवानांसह ४ व ५ वर्षीय दोन बालकांचा समावेश
वाशीम : काही दिवसापुर्वी एकही करोना रुग्ण न आढळल्यामुळे ग्राीन झोनकडे वाटचाल सुरु असतांना तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही आवर्जुन गौरव केला असतांना हिंगोली जिल्हयात एसआरपीएफच्या काही जवानंाना कोरोनाने गाठल्यामुळे हिंगोलीकरांच्या आनंदावर विरजण पडले आहे. बाहेर जिल्हयातून कर्तव्यावरुन परतांना एसआरपीएफच्या पाच जवानांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले होते. त्यानंतर दरदिवशी हिंगोलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच असून आजघडीला हिंगोली जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या १४ झाली असल्याचे आज, २८ एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातून प्राप्त अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हिंगोली जिल्हयात कोरोना संकट वाढले असून हिंगोली जिल्हा ग्रीन झोनमधुन ऑरेंज झोनमध्ये व आता रेड झोनच्या दिशेने वाटचाल करतांना दिसून येत आहे. या कोरोना रुग्णांमध्ये १२ एसआरपीएफ जवानांसह ४ व ५ वर्षीय दोन बालकांचा समावेश आहे. यापैकी एका जवानाला कुठलीही गंभीर लक्षणे नसली तरी उच्च रक्तदाब असल्याने विशेष काळजी म्हणून औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांनी आज दिलेल्या कोरोना रिपोर्टनुसार, सद्यस्थितीत आयसोलेशन वार्डामध्ये भरती असलेल्या १८१ रुग्णांपैकी १५२ रुग्णांची रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात आली असून उर्वरीत १६ रुग्णांपैकी १३ जणांचे चाचणी अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर २९ जण आयसोलेशन वार्डात सद्या भरती आहेत.
वसमत येथील शासकीय क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल एकूण २२४ रुग्णांपैकी १६८ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत तर ५४ जणांना सुटी देण्यात आली आहे. तर १६९ जण क्वारंटाईन आहेत. कळमनुरी येथील शासकीय क्वारंटाईन सेंटरमध्ये एकूण दाखल १०३ संशयीत रुग्णांपैकी ५४ जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात आली तर ४९ जण सध्या क्वारंटाईन आहेत. औंढा येथील शासकीय क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल ६८ पैकी २७ अहवाल निगेटीव्ह आले असून या २७ जणांना सुटी मिळाली. ४१ जण सध्या क्वारंटाईन आहेत. वसमत, कळमनुरी व औंढा येथे क्वारंटाईन झालेल्यांपैकी एकाही जणांना कोरोनाची बाधा झालेली नाही. सेनगाव येथील शासकीय क्वारंटाईन सेंटरमध्ये एकूण दाखल ६१ जणांपैकी ६० जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह तर १ रुग्णाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. यापैकी एकाही व्यक्तीला डिस्चार्ज करण्यात आले नाही. तर हिंगोलीतील एस.आर.पी.एफ. सेंटरमध्ये दाखल एकूण १६५ जणांंचे अहवाल निगेटीव्ह आले असले तरी त्यांना खबरदारी म्हणून अद्याप सुटी देण्यात आलेली नाही.
यासोबतच हिंगोलीतील क्वारंटाईन सेंटरमध्ये सद्यस्थितीत एकूण १८० जण क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. सद्यस्थितीत आयसोलेशन वार्डातील १३ व सेनगाव येथील १ असे मिळून १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
यामध्ये एसआरपीएफ हिंंगोलीचे ११ जवान व एसआरपीएफ जालनाचा १ जवान अशा एकूण १२ जवानांना कोरोनाने गाठले आहे. जालनाच्या एसआरपीएफ जवानाच्या संपर्कातील त्याच्या ४ वर्षीय पुतण्याला कोरोनाची बाधा झाली असून तो १३ वा रुग्ण आहे. वरील सर्व १३ रुग्ण आयसोलेशन वार्डात भरती आहेत. तर १४ वा रुग्ण सेनगाव येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये आज मिळालेल्या अहवालावरुन आढळून आला आहे. हा १४ वा रुग्ण ५ वर्षीय बालक असून या बालकाचे आईवडील औरंगाबाद येथून हिंगोलीत आले होते. या सर्वाना सेनगाव येथील शासकीय क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून बाधीत बालकाच्या आईवडीलांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. हिंगोली जिल्हयात कोरोना पॉझीटीव्ह असलेल्या सर्व १४ रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नसल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून कळविण्यात आले आहे. यापैकी कोरोनाची लागण झालेला एका जवानाला उच्च रक्तदाब असल्याने विशेष काळजी म्हणून त्याला औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.
आजपर्यत हिंगोली जिल्हयात एकूण १५ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असून यापैकी १ रुग्ण उपचाराअंती निगेटीव्ह झाल्याने त्याला सुटी देण्यात आली असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून कळविण्यात आले आहे.
अत्यंत अत्यावश्यक असल्याशिवाय हिंगोलीकरांनी घराबाहेर पडू नये व अत्यावश्यक सेवा वगळता इतरांनी घरीच थांबुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ