Ticker

6/recent/ticker-posts

...अन् पोलीस विभागाच्या मदतीमुळे नावली येथील त्या मजुरांची उपासमार थांबली


...अन् पोलीस विभागाच्या मदतीमुळे नावली येथील त्या मजुरांची उपासमार थांबली
वाशीम - संचारबंदीत नागरीकांसह पोलीस विभागही केवळ कायदाच न पाहता आपल्या संवेदना जपून माणूसकीच्या नात्याने आपल्या परीने संकटात सापडलेल्यांना मदत करीत आहे. पोलीस विभागाची सह्दयता शिरपूर हद्दीतील ग्राम नावली येथील मजुरांनी अनुभवली असून पोलीसांची योग्य वेळी मदत मिळाल्यामुळे या मजुरांची उपासमार थांबली आहे. या घटनेमुळे पोलीस केवळ संचारबंदीत नियमाचे उल्लंघन करणार्‍यांना केवळ शासनच करत नसुन अडचणीत आलेल्यांना मदतीचा हात देवून सुशासनाची निर्मिती आणि माणूसकीच्या भावनाही जपत असल्याचा प्रत्यय आला आहे.
 याबाबतची माहिती अशी की, वाशीम जिल्हयातील शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम नावली येथील रस्त्यावर पुलाचे काम सुरु असून या कामावर मध्यप्रदेशातील खंडवा जिल्हयातील कोरकू जमातीचे 60 ते 70 लोक मजुरीकाम करत आहेत. या मजुरांचे अन्नधान्य संपले असून त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आल्याची माहिती पोलीस विभागाला मिळाली. त्यामुळे 15 एप्रिल रोजी सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी गोवर्धनचे बिट जमादार पोहेकॉ. दामोधर इप्पर, पोलीस कर्मचारी रवि सैबेवार, आत्माराम राठोड, राजु वानखडे, विजय घुगे, संतोष पाईकराव, गंगाराम बडेराव, अभिजित बांगर, रोहीत ठाकरे, मनिष बिडवे, गजानन ब्राम्हण, विठ्ठल शिंदे, चंचल वानखेडे, मिनाक्षी भाकरे यांच्यासह नावली येथे जावून या मजूर कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली. या मजुरांकडील अन्नधान्य संपले असल्याचे माहित पडताच त्यांना गहू, तांदुळ, डाळ, मिरची, भाजीपाला आदी साहित्याचे वाटप केले. तसेच या मजुरांना कोरोना या आजाराविषयी माहिती देवून साबणाने नियमित हात धुण्यासह सामाजीक अंतर पाळण्याच्याही सुचना दिल्या. पोलीस विभागाच्या या मदतीमुळे या मजुरांची उपासमार टळली असून पोलीस आणि नागरीक अशा अनामिक नात्याचे भावबंध अधिक घट्ट झाले आहेत. आपल्या घरादारापासुन दुर राहून व स्वत:चा जीव धोक्यात घालून पोलीस केवळ कायदा पाळण्यासाठीच नव्हे तर संकटात सापडलेल्या नागरीकांना मदतीचा हात देत असल्याची भावना पोलीस विभागावरचा विश्‍वास अधिक घट्ट करणारी व मनाला सुखावणारी असल्याचे या घटनेवरुन दिसून येत आहे.