Ticker

6/recent/ticker-posts

इंटरनेट ‘रेडीओ चंदेरी दुनिया’ ची रसिकांना भुरळ : श्रोत्यांच्या संख्येत वाढ : “नंबर वन’ कडे वाटचाल : वाशीम जिल्हयाचा बहुमान


इंटरनेट ‘रेडीओ चंदेरी दुनिया’ ची रसिकांना भुरळ : श्रोत्यांच्या संख्येत वाढ : “नंबर वन’ कडे वाटचाल : वाशीम जिल्हयाचा बहुमान
वाशिम - ‘आवड युवा मनाची’ हा मंत्र घेवून युवा श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या ‘रेडीओ चंदेरी दुनिया’ या मोबाईल अ‍ॅप स्वरुपात असलेल्या इंटरनेट रेडीओने मनोरंजनाबरोबर, अपडेट बातम्या, स्वस्त दरात जाहिराती आणि रोजगाराची हमी यामुळे आपला उत्तम दर्जा टिकवून ठेवला असून अल्पावधीतच रसिकांना भुरळ पाडली आहे. सोशल मिडीयाच्या वेगात पारंपारीक प्रसारमाध्यमांना आपली दिशा बदलावी लागली असली तरी अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या रेडीओ चंदेरी या इंटननेट रेडीओला युवा पिढीची पसंती मिळत असून ‘रेडीओ चंदेरी दुनिया’ ची वाटचाल नंबर वनकडे सुरु झाल्याचे दिसून येत आहे.
 आजच्या डिजीटल तंत्रज्ञानामध्ये रेडीओचे महत्व अजुनही अबाधित आहे. रेडीओची संकल्पना काही वर्षापुर्वी ग्लोबल टू लोकल होती. आता ती लोकल टु ग्लोबल झाली आहे. आजघडीला विविध विषयाला वाहीलेले २५१ कम्युनिटी रेडीओ देशात सुरु आहेत. त्यापाठोपाठ इंटरनेट रेडीाओला रसिकांची पसंती मिळू लागली आहे. रेडीओवरून फक्त गाणीच ऐकवली जात नाहीत, तर त्याव्दारे ऐकवल्या जाणारा आशय, वर्तमानातील महत्वाच्या घडामोडी यामुळे श्रोते इंटरनेटशी जोडले जात असून सोशल मिडीयाच्या लाटेतही इंटरनेट रेडीओ आपले अस्तित्व टिकून आहे.
 विदर्भ मराठवाड्याच्या सिमारेषेवर असलेल्या व जगाची मध्यरेषा ज्या ठिकाणावरुन जाते त्या वाशीमसारख्या ठिकाणी डॉ. माधव हिवाळे यांच्या प्रयत्नातुन सुरु झालेल्या ‘चंदेरी दुनिया’ या इंटरनेट रेडीओ आजघडीला भारतातील हजारो श्रोत्यांकडून ऐकल्या जात आहे. दृश्य व श्रवण स्वरुपातील रसिकांची तुलना केल्यास टीव्हीवर वारंवार दाखविल्या जाणारे तेच तेच चित्रपट व त्याच त्या बातम्यांनी कंटाळलेल्या रसिकांचा कल इंटरनेट रेडीओकडे वळल्याचे दिसून येत आहे. त्यातच नविन व जुन्या. मराठी व हिंदी चित्रपट गितांनी सजलेल्या ‘रेडीओ चंदेरी दुनिया’ या रेडीओने अल्पावधीतच श्रोत्यांना वेड लावल्याचे दिसून येत आहे. आज टीव्हीवर एकच चित्रपट अनेकदा दाखविण्यात येतो. तर वृत्तवाहीनीवरही एकच बातमी दिवसभर दाखविल्या जात असल्यामुळे मनोरंजन आणि ज्ञानात भर टाकण्याच्या उद्देशाने टीव्हीसमोर बसणार्‍या रसिकांचा भंग होतो. अशावेळी संपुर्ण मनोरंजन, अपडेट बातम्यांनी परिपूर्ण असलेल्या ‘रेडीओ चंदेरी दुनिया’ या इंटरनेट रेडीओ वाहीनीचा उत्तम पर्याय रसिकांनी निवडला आहे. या रेडीओवर श्रोत्यांसाठी नविन व जुन्या गाण्यांची चंगळ आहे. त्यामुळे सर्व वर्गातील श्रोत्यांच्या पसंतीस हे रेडीओ अ‍ॅप उतरले आहे. इतकेच नव्हे तर या रेडीओच्या माध्यमातून सुशिक्षीत बेरोजगारंासाठी नोकरीचा उत्तम पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला असून या रेडीओ वाहीनीच्या माध्यमातून युवांना आपल्या अभिजात कलेच्या माध्यमातून रेडीओ जॉकी बनण्याची संधीही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याहीपुढे एक पाऊल पुढे जात रोजगाराला चालना देण्यासाठी कमीत कमी दरामध्ये जास्तीत जास्त श्रोत्यांपर्यत आपल्या उत्पादनांच्या जाहीराती पोहचविण्याची हमी या वाहीनीने उद्योजकांना दिली आहे.
 आपल्या या उपक्रमाबद्दल बोलतांना रेडीओ चंदेरी दुनिया चे संचालक डॉ. माधव हिवाळे म्हणाले की, वाशीमसारख्या ठिकाणावरुन हा मनोरंजनाचा उपक्रम सुरु करतांना इंटरनेट रेडीओ चालेल की नाही याची धास्ती होती. मात्र जगभरातील मराठी श्रोते अशा नव्या संकल्पनांना प्रतिसाद देत आहेत. शिवाय श्राोत्यांना काय नाविण्यपूर्ण मिळते हे महत्वाचे आहे. कोणत्याही ठिकाणी अगदी सहजपणे ऐकता येणारे माध्यम म्हणून इंटरनेट रेडीओकडे पाहीले जाते. रसिकांच्या अभिरुचीकडे लक्ष, वेळेनुसार अपडेटेशन आदी बाबीमुळे ‘चंदेरी दुनिया’ या इंटरनेट रेडीओचा उपक्रम यशस्वी झाला असून जगभरात हा उपक्रम युवा रसिकांच्या पसंतीस उतरला आहे.


रसिक श्रोत्यांना या लिंकचा उपयोग करुन या सेवेचा आनंद अगदी मोफत घेता येतो.


https://play.google.com/store/apps/details?id=com.radio.radiochanderidunia