भिषण उन्हाळ्यात जिल्हयातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करा - अॅड. भारत गवळीकर
वाशीम - करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी 24 मार्चपासून भारतात संपुर्ण लॉकडाऊन करण्यात आले असून या लॉकडाऊनमुळे सर्व सरकारी यंत्रणा आरोग्य मोहीमेत गुंतली असल्याने भिषण उन्हाळ्याची चाहुल लागली तरी भारतातील गावांमध्ये अद्याप पिण्याच्या पाण्याचे ठोस नियोजन करण्यासंदर्भात योग्य तो निर्णय अद्यापही सरकारकडून घेतला गेलेला नाही. भारतातील हजारो खेडेगावंामध्ये स्वातंत्र्याच्या 70 वर्षापासून पुरेसे पिण्याचे व वापरण्याचे पाणी अजुनही मिळत नाही. त्यामुळे उन्हाळ्याची चाहुल लागताच ग्रामीण भागातील कुपनलीका, बोअर, विहीरी ह्या आटायला सुरुवात होते. सरकारकडून मार्चच्या आधीपासून गावांमध्ये टँकरने पिण्याचे पाणी पुरविण्यासंदर्भात हालचाली सुरु होतात. मात्र यावर्षी करोना या महामारीचा मुकाबला करण्यासाठी सरकारसह सर्व सरकारी विभाग गुंतले असल्याने उन्हाळ्याच्या तोंडावर गावांना भेडसावणार्या या पाण्याचे संकट अजुनही सरकारच्या लक्षात आले नाही. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात हजारो पुरुष, महिला एक हंडा पिण्याचे पाणी मिण्यासाठी 5-5 किलोमिटर पायपीट करतात. शाळकरी मुले सुध्दा पाण्यासाठी आपली शाळा बुडवून पाण्याचा शोध घेतात. पिण्याच्या पाण्याच्या शोधासाठी भटकंती करीत असतांना दरवर्षी उन्हाळ्यात खेडेगावामधील अनेक पुरुष, महिला व लहान मुले या पाण्याचे बळी पडतात.
यावर्षी वाशीम जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे सरकारी यंत्रणेकडून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासंदर्भात सरकारसह स्थानिक स्वराज्य यंत्रणाकडून अद्यापही उपाययोजना करण्यात आल्या नसल्यामुळे बर्याचश्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावामधील लोक घरात असल्यामुळे त्यांना लागणारे पिण्याचे व वापरायचे पाणी पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही व दिवसरात्र घरात राहावे लागत असल्यामुळे पाण्याचा वापर जास्त होत आहे. पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाबाबत स्थानिक ग्रामपंचायती मूग गिळून काम करतांना दिसून येत आहेत. ज्याप्रमाणे जनतेला सरकारने मोफत अन्न धान्याची सोय करून दिली त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतने दिवसातून दोन वेळा मोफत पिण्याच्या पाण्याची सोय करून द्यावी. जेणेकरून जिल्ह्यातील कुठल्याही नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ उडणार नाही. तसेच या वर्षीचे पाणी देयके सर्व जनतेला माफ करावे. ग्रामस्थांना पाण्यासंदर्भात ग्रामपंचायतने वेळेवर निर्णय घेतला नाही तर सदर ग्रामपंचायतवर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे वाशिम जिल्हा संयोजक अॅड. भारत गवळीकर रिठद यांनी केली आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ