Ticker

6/recent/ticker-posts

वाशीम जिल्हा कोरोनामुक्त : आयसोलेशन कक्षात दाखल ५ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह’


वाशीम जिल्हा कोरोनामुक्त : आयसोलेशन कक्षात दाखल ५ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह’
वाशिम, दि. २८ (जिमाका) : अमरावती जिल्ह्यातील कोरोना बाधित व्यक्तीच्या निकटच्या संपर्कात आलेल्या वाशिम जिल्ह्यातील पाच व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याची आल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही कोरोना बाधित व्यक्ती नसून आजघडीला वाशीम जिल्हा कोरोनामुक्त आहे.
 अमरावती येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या पाच व्यक्तींना जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करून त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने २७ एप्रिल रोजी अकोला येथील वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज, २८ एप्रिल रोजी प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह’ आहेत.
 जिल्ह्यात सध्या २७ व्यक्तींना गृह विलगीकरणात तर २७ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ४६ घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी ४५ अहवाल निगेटिव्ह आले तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला होता. एकमेव कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीवर उपचारानंतर त्याचे  २० दिवसानंतरचे अहवाल निगेटिव्ह आले. सदर व्यक्तीला २५ एप्रिल रोजी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात एकही कोरोना बाधित व्यक्ती नसल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली आहे.