Ticker

6/recent/ticker-posts

वाशीम जिल्हा करोनामुक्त झाल्याबद्दल अधिकार्‍यांचा सत्कार : लॉ. धाडवे मित्रमंडळाचा पुढाकार


वाशीम जिल्हा करोनामुक्त झाल्याबद्दल अधिकार्‍यांचा सत्कार
लॉ. धाडवे मित्रमंडळाचा पुढाकार : जिल्हावासीयांच्या वतीने मानले आभार
वाशीम - जिल्ह्यात एकमेव असलेल्या मेडशी येथील करोनापिडीत रुग्णांचे 20 दिवसानंतरचे दोन्ही चाचणी अहवाल आज, 24 एप्रिल रोजी सकाळी निगेटीव्ह आल्याने जिल्हावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून जिल्हा ग्रीन झोनकडे जाण्याची वाटचाल सुरु झाली आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग, पत्रकार बांधव आणि सामान्य जनतेच्या एकत्रित प्रयत्नामुळे जिल्हयात कोरोना रुग्णाची वाढ झाली नाही. त्याबद्दल लॉ. वसंतराव धाडवे मित्रमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आदींचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
 जगभरात करोना विषाणूने धुमाकुळ घातल्यानंतर या संकटाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्चपासून 15 एप्रिलपर्यत संपुर्ण देशभर लॉकडाऊन घोषीत केला होता. तर दुसर्‍या टप्यात 15 मार्चपासून 3 मे पर्यत लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. या कालावधीत महाराष्ट्रासह देशभरात करोना रुग्णांचे आकडे वाढले आहेत. करोना पिडीत रुग्णांच्या उपचारासाठी, संशयीतांचे क्वारंटाईन, आयसोलेशन, चाचणी आणि लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, पत्रकार बांधव, आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग आणि यशस्वी प्रयत्नामुळे वाशीम जिल्हयात केवळ एकच करोना रुग्ण आढळून आला असून या आजाराच्या रुग्णामध्ये वाढ झाली नाही. या एकमेव रुग्णावरील यशस्वी उपचारामुळे 24 एप्रिल रोजी या रुग्णाची चवथी चाचणी निगेटीव्ह आली असून या रुग्णाला सुटी देण्यात येणार आहे. त्यामुळे वाशीम जिल्हा संपुर्णपणे कोरोनामुक्त झाला असून जिल्ह्याची ग्रीन झोनकडे वाटचाल सुरु झाली आहे. या यशामुळे लॉ. धाडवे मित्रमंडळाच्या वतीने लॉ. वसंतराव धाडवे यांनी आज, कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी ह्षीकेश मोडक, जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांच्यासह सर्व संबंधीत अधिकार्‍यांचा पुष्पगुच्छ देवून भावपुर्ण सत्कार केला व जिल्हावासीयांच्या वतीने त्यांचे आभार मानले. सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या धाडवे मित्रमंडळाच्या वतीने लॉकडाऊन कालावधीत आपले सामाजीक कर्तव्य समजून जिल्हयात वितरीत केलेल्या 10 हजार माहितीपत्रकाव्दारे जनतेत करोना आजाराविषयी जनजागृती केली होती.  शिवाय लॉकडाऊन काळात नागरीकांची उपासमार होवू नये याकरीता वारा जहांगीर व वाशीम येथील गटई कामगारांचे कुटुंब व गोरगरीब अशा 57 परिवारांना जीवनावश्यक वस्तू, किराणा, अन्नधान्य व भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले होते. सोबतच जनतेच्या सुरक्षेसाठी आपला जीव धोक्यात घालुन रस्त्यावर अहोरात्र सेवा देणार्‍या पोलीस विभागाच्या सुरक्षेसाठी 30 हजार रुपये किंमतीचे 500 मुख आवरणे (फेसशिल्ड) देण्यात आले होते.