Ticker

6/recent/ticker-posts

समाजसेवक नितीन मडके यांच्या वतीने चामुंडादेवी परिसरात ४० क्विंटल धान्याचे वितरण


समाजसेवक नितीन मडके यांच्या वतीने चामुंडादेवी परिसरात ४० क्विंटल धान्याचे वितरण
वाशिम - कोरोनाच्या संकटामुळे जिल्हयात सर्वत्र सध्या लॉकडाऊन सुरु असून लोकांचा रोजगार आणि काम पूर्णत: बंद आहे. कामधंदे बंद झाल्यामुळे गरीब मजूर, कामगार, छोटी मोठी कामे करणार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कठीण काळात गोरगरीबांना दोन वेळचे जेवण मिळावे या उदात्त हेतूने समाजसेवक व शिवसैनिक नितीन मडके यांच्या पुढाकारातुन स्थानिक चामुंडादेवी परिसरातील गोरगरीब परिवारांना २५ एप्रिल रोजी ३० क्विंटल गहू आणी ११ क्विंटल तांदूळचे वितरण सामाजीक अंतर राखून करण्यात आले. या उपक्रमाला नगराध्यक्ष अशोक हेडा, मुख्य आयोजक शिवसैनिक नितीन मडके, नगरसेविका सौ. आशा सचिन मडके, समाजसेवक राजाभैय्या पवार, सुनील वानखेडे, सचिन मडके, छोटू पट्टेबहादूर, महादू मडके, भगवान मडके, संतोष मडके,श्यामा वानखेडे, गणेश इंगळे, गणेश पवार, विक्की राऊत, सिद्धार्थ कांबळे, कैलास मडके, बंडू शिंदे, राम गाभणे आदींची उपस्थिती होती. लॉकडाऊनच्या काळात अचानक मिळालेल्या या मदतीमुळे गोरगरीब जनतेच्या चेहेर्‍यावर समाधान दिसून आले.