आनंदवार्ता, वाशीम जिल्हयातील एकमेव कोरोना बाधित व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह’ : उद्या होणार सुटी : दिलासा मिळाला, मात्र सतर्क राहणे आवश्यक : जिल्हाधिकारी
वाशिम, दि. 24 (जिमाका) : कोरोना विषाणूचा वाशिम जिल्ह्यात शिरकाव झाल्याची बाब 3 एप्रिल रोजी समोर आली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने अतिशय सकारात्मक प्रयत्न करून जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखला. त्यानंतर आता 21 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर जिल्ह्यातील एकमेव कोरोना बाधित व्यक्तीचा कोरोना विषयक अहवालही निगेटिव्ह’ आला असून त्याला शनिवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असतानाच जिल्ह्याबाहेर जावून आलेल्या एका व्यक्तीला सुद्धा या विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. जगभरात कोरोना संसर्गामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली. कोरोना बाधित झालेल्या या व्यक्तीच्या नजीकच्या संपर्कातील (हायरिस्क) 12 व्यक्तींना तातडीने आयसोलेशन कक्षात दाखल करून त्यांच्या सुद्धा घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. सुदैवाने त्यापैकी कोणालाही कोरोना विषाणू संसर्ग झाला नसल्याचे दिसून आले.
जिल्हा प्रशासनाने तातडीने कार्यवाही करीत कोरोना बाधित रुग्ण आढळलेला परिसर सील केला, त्याठिकाणी कन्टेन्टमेंट प्लॅन लागू करण्यात आला. याठिकाणी आरोग्य विभागाच्या 14 चमूची स्थापना करून 1 हजार 060 कुटुंबातील 5 हजार 320 लोकांचा सर्व्हे करून त्यांची माहिती संकलित करण्यात आली. कन्टेन्टमेंट प्लॅन लागू केल्यापासून पुढील 14 दिवस नियमितपणे हे चमू सर्व 1 हजार 60 कुटुंबांना प्रत्यक्ष भेटी देवून नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेत होते. या कालावधीत कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचा संशय असलेला एकही व्यक्ती आढळला नाही. कन्टेन्टमेंट प्लॅन लागू केल्याच्या 14 दिवसानंतरही या परिसरातील नागरिकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येत आहे. कोरोना बाधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्यापासून 24 दिवसानंतर सुद्धा या परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही व्यक्ती आढळून आला नसल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश आल्याचे स्पष्ट झाले आहे.
21 दिवसांची अथक मेहनत, कोरोना हद्दपार
कोरोना विषाणूला थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासनातील महसूल, पोलीस व आरोग्य यंत्रणा ताकदीने लढत असताना जिल्ह्यात आढळलेल्या एकमेव कोरोना बाधित व्यक्तीला बरे करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य पथक गेली 21 दिवस अथक प्रयत्न करीत होते. शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार कोरोना बाधित व्यक्तीवर उपचार केल्यानंतर 14 व्या व 15 व्या दिवशी त्या व्यक्तीच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले. मात्र यापैकी एक अहवाल पॉझिटिव्ह’ आला. त्यानंतर खचून न जाता या पथकाने पुन्हा पाच दिवस सदर रुग्णावर उपचार करून 20 व्या व 21 व्या दिवशी त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुन्हा तपासणीला पाठवले. यावेळी मात्र दोन्ही अहवाल निगेटिव्ह’ आले आणि कोरोना’ला जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कामगिरी फत्ते झाली.
दिलासा मिळाला, मात्र सतर्क राहणे आवश्यक : जिल्हाधिकारी
जिल्ह्यातील कोरोना बाधित व्यक्तीचे रिपोर्ट निगेटिव्ह’ आल्याने त्याला रुग्णालयातून सुट्टी मिळणार आहे, ही जिल्ह्यासाठी समाधानाची बाब आहे. मात्र, भविष्यात कोरोना’चा शिरकाव जिल्ह्यात होवू नये, यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. शासनाच्या सूचनेनुसार 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असून सर्व नागरिकांनी त्याचे पालन करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे. तसेच जिल्हा प्रशासनातील महसूल विभाग, पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाच्या मेहनतीमुळे जिल्ह्यात सध्या एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ