आपल्या सुरक्षेसाठी रमजान महिन्यात घरीच राहून परिवारासोबत नमाज पठण करा - प्रा. अबरार मिर्झा
वाशीम - जागतीक आरोग्य संघटनेचे कोरोना विषाणूपासून सामाजीक संसर्गातून होणार्या नोवेल कोविड-19 या आजाराला जागतीक महामारी घोषीत केले असून ही साथ सामाजीक संसर्गातुन साखळीव्दारे पसरु नये याकरीता रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांनी परिसरात किंवा मशिदीत एकत्र न येता आपआपल्या घरी परिवारासोबत नमाज पठण करुन रोजे सोडावे असे आवाहन समाजसेवक प्रा. अबरार मिर्झा यांनी मुस्लीम बांधवांना केले आहे.
रमजान महिना सुरु होत असून या पूर्ण महिनात मुस्लिम समाज 30 दिवस रोजे ठेवतात. एक रोजा पंधरा तासाचा असतो व रोजामध्ये दिवसभर एक अन्नाचा दाना किंवा एक थेंब पाणीही घेणे वर्ज्य आहे. जे रोजा ठेवतात त्याला रोजदार म्हणतात. रोजा मानवाला सबुरी आणि शांतीची शिकवण देतो. गरीबाचे दु:ख काय असते याची शिकवण हा रमजान महिना देतो. या पवित्र महिन्यात गरीब आणि गरजू लोकांना जकात देण्यात येते. ज्यायोगे गरीब लोकांनाही ईद साजरी करता येईल. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मशिदीत तारावी नमाजाचे पठण करतात. तारावीत महिन्याभरात पूर्ण कुराण शरीफचे पठण करण्यात येते. परंतु सध्या देशात करोना विषाणूची साथ चालू असून या महामारीला रोखण्यासाठी प्रशासन खुप परिश्रम घेत आहे. सामाजीक संसर्गातुन साखळीव्दारे या रोगाचा प्रसार होवू नये याकरीता वाशीम जिल्हा 3 मे पर्यत लॉकडाऊन करण्यात आला असून या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग कसोशीने प्रयत्न करुन असून या आजाराच्या बचावात्मक जनजागृतीसाठी पत्रकार बांधव प्रशासनाला साथ देत आहेत. त्यामुळे मुस्लीम बांधवांनी रमजान महिन्यात परिसरात किंवा मशिदीत नमाजासाठी गर्दी न करता आपआपल्या घरीच सुरक्षीत राहुन परिवारासोबत नमाज पठण करुन रोजा सोडावा. यासोबतच शासनाने दिलेल्या सर्व आदेशाचे पालन करावे असे आवाहन समाजसेवक प्रा. अबरार मिर्झा यांनी केले आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ