करोनाच्या उपाययोजनेसाठी प्रति सर्कल 50 हजाराचा निधी वितरीत : वाशीम जि.प. शेष फंडातून 26 लाखाची तरतूद
वाशिम - जिल्हयातील ग्रामीण भागात करोना व्हायरसच्या उपाययोजनेसाठी जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून 26 लाखाची तरतूद करण्यात आली असून याअंतर्गत प्रति सर्कल 50 हजार याप्रमाणे 52 सर्कल करीता एकुण रु. 26 लाख रुपयाचा निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.
या निधीचा उपयोग कोविड-19 चे पेशंट ने-आण करण्यासाठी वाहन सुविधा उपलब्ध करणे व तातडीची तपासणी करण्यासाठी वापरण्यात येणार आहे . तसेच संबंधित गटाचे जिल्हा परिषद सदस्य आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुचविलेल्या कामाकरीता हा निधी वापरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली. सदरचा निधी हा कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरण्यात येणार असुन तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांच्या स्तरावर उपलब्ध आहे.
संपूर्ण जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरस बाबत आरोग्य यंत्रणेने ग्रामीण भागात जनजागृती करण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी मागील आठवडयात आरोग्य विभागाला दिले होते. त्यानंतर आज उपाध्यक्ष डॉ. शाम गाभणे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना आणि आरोग्य सभापती चक्रधर गोटे यांनी पुढाकार घेऊन पुढील काळात गावातील लोकांना अडचणीचा सामना करावा लागुनये यासाठी आर्थिक तरतुद करुन ठेवली आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ