वाशीम जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी फिरताना चेहर्यावर मास्क न लावल्यास 200 रुपये दंड
जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांचे आदेश
वाशिम, दि. 13 (जिमाका) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून आता चेहर्यावर मास्क न लावता शहरात फिरणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या संसार्गावर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम 1897 मधील खंड 2, 3 व 4 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीनुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाशिम जिल्ह्यात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून वाशिम जिल्ह्यात मास्क न लावता शहरात सार्वजनिक ठिकाणी फिरणार्या नागरिकांकडून एकरकमी 200 रुपये दंड वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.
तसेच दंड वसूल केल्यानंतर संबंधिताला पावती द्यावी. तसेच एकाच नागरिकावर एकापेक्षा जास्त वेळा दंडाची रक्कम आकारण्यात आल्यास, अशा नागरिकाला शहरामध्ये फिरण्यास मज्जाव करून कलम 188 अन्वये कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ