Ticker

6/recent/ticker-posts

कृषी मालाच्या वाहतुकीसाठी 12 तास डिझेल विक्री : शेतकर्‍यांना मोठा दिलासा - वैद्यकिय सेवा व शासकीय वाहनांसाठी 24 तास परवानगी


कृषी मालाच्या वाहतुकीसाठी 12 तास डिझेल विक्री : शेतकर्‍यांना मोठा दिलासा
वैद्यकिय सेवा व शासकीय वाहनांसाठी 24 तास परवानगी
वाशीम - देशात 3 मे पर्यत लॉकडाऊन वाढविल्यानंतर शेतमालाची वाहतुक करणार्‍या वाहनांसाठी दुपारी 12 पर्यतची वेळ ही अपुरी पडत असल्याने केवळ शेतीउत्पादनांची वाहतूक करणार्‍या वाहनांसाठी डिझेल विक्रीची मुदत सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यत ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यासोबतच वैद्यकिय सेवेतील वाहने व शासकीय वाहनांसाठी 24 तास इंधन पुरवठा करण्याची मुभा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज (दि. 15 एप्रिल) दिले आहेत. दरम्यान जिल्हयातील सर्व पेट्रोलपंपासाठी पेट्रोलविक्रीची मुदत ही याआधी दिलेल्या आदेशाप्रमाणे म्हणजेच सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यतच राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासोबतच लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवा असलेल्या कृषि सलंग्न बाबी, कृषि उत्पादनांची वाहतूक तसेच कृषि उत्पन्न बाजार समिती सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कृषि मालाची वाहतूक सुरळीत सुरु राहण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंपावर सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कृषि मालाची वाहतूक करणार्‍या वाहनांना केवळ डिझेल विक्रीस मुभा देण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या या निर्णयामुळे जिल्हयातील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला असून शेतीकामांना वेग येणार आहे.