Ticker

    Loading......

कोरोनाच्या लढ्यात मुस्लीम बांधवांचा सहभाग : सीएम फंडात 11 हजाराची मदत


कोरोनाच्या लढ्यात मुस्लीम बांधवांचा सहभाग : सीएम फंडात 11 हजाराची मदत
वाशीम - भारत देशासह महाराष्ट्रावर कोसळलेल्या कोरोना महामारीचे संकट दुर होण्यासाठी आज प्रत्येक जातीधर्माचा व्यक्ती आपला जात-धर्म विसरुन आपआपल्या परीने मदतीचा हात पुढे करीत आहे. कुणी जलदान, कुणी अन्नदान तर कुणी आरोग्य किटचे वाटप करुन नागरीकांचे जगणे सुसह्य करुन सामाजीक सलोखा व बंधुभाव जोपासत आहे. कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून प्रत्येकजण सीएम फंडामध्ये आपले आर्थिक योगदान देत आहे. कोरोनाच्या या लढ्यामध्ये मुस्लीम बांधवही आपले योगदान देत असून कारंजा येथील जमियत उलेमा-ए-हिंद तसेच तबलीगी जमातचे मो. मौलवी मजहर मझाहिरी यांनी कोरोनापिडीतांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 11 हजार रुपयाची मदत दिली आहे. मदतीचा धनादेश त्यांनी कारंजाचे उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे व तहसिलदार धिरज मांजरे यांच्या सुपुर्द केला आहे. यासोबतच देशावर कोसळलेले हे संकट फार मोठे असून या संकटाला नाहीसे करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरीच राहून कोरोनाची ही साखळी तोडण्यास मदत करावी. आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेण्यासोबतच वारंवार साबणाने हात धुवावे. यासोबतच प्रत्येक सुचनांचे पालन करुन शासनाला सहकार्य करावे असे आवाहन मो. मौलवी मजहर मझाहिरी यांनी नागरीकांना केले आहे.