जिल्ह्यातील 10 हजार गरीब परिवारांना धान्य व किराणा किटचे वितरण
खा. भावना गवळी यांचा पुढाकार : गोरगरीबांना दिलासा
वाशीम - कोरोना महामारीमुळे जिल्ह्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमिवर शिवसेना खासदार भावनाताई गवळी यांच्या पुढाकारातून व शिवसैनिकांच्या सहकार्यातून जिल्हयातील तब्बल 10 हजार गोरगरीब कुटुंबांना धान्य व किराणा किटचे वितरण करण्यात आले. हा सामाजीक उपक्रम शनिवार, 25 एप्रिल रोजी मानोरा, कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव, रिसोड या तालुक्यात शिवसैनिकांच्या परिश्रमातून घरोघरी सामाजीक अंतर ठेवून राबविण्यात आला. खा. गवळी यांच्या मदतीमुळे लॉकडाऊन काळात गोरगरीबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात 24 मार्चपासून येत्या 3 मे पर्यत सातत्याने लॉकडाऊन सुरु असल्याने हातावर कमावून पोट भरणार्या अनेक मजुरदार, श्रमिक कुटुंबांची मोठी उपासमार होत आहे. कामधंदे ठप्प पडल्यामुळे पैशाची आवक नाही त्यामुळे जगावे कसे हाच प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. ही बाब लक्षात घेवून शिवसेना खासदार भावनाताई गवळी यांच्या पुढाकारातुन व शिवसेना पदाधिकारी, जि.प. न.प. सदस्य आदींच्या सहकार्यातुन गोरगरीब, निराधार, श्रमिक व कामगार कुटुंबांना मदत पोहचविण्यात आली. खा. गवळी यांच्या वतीने यापुर्वी जिल्हयातील दोन हजार कुटुंबांना किराणा किटचे वितरण करण्यात आले होते.
स्थानिक जनशिक्षण संस्थान येथील खासदार जनसंपर्क कार्यालयात 25 एप्रिल रोजी खासदार भावनाताई गवळी यांनी धान्य व किराणा किटचे वाटप करण्यात येणार्या वाहनांची पाहणी करुन वाहनांना रवाना केले. त्यानंतर जिल्हयातील मानोरा, कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव, रिसोड आदी लॉकडाऊन प्रभावित भागातील गोरगरीब, गरजु, निराधार, कामगार कुटुंबांना शिवसैनिकांच्या हस्ते घरोघरी जावून व सामाजीक अंतराचे भान ठेवून मदतीचे वाटप करण्यात आले. मिळालेल्या या मदतीमुळे गोरगरीबांच्या चेहर्यावर आनंद दिसून येत होता.
या धान्य व किराणा मदत वितरणासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब देशमुख, उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, वाशीम तालुका प्रमुख रामदास मते पाटील, शशिकांत पेंढारकर, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, उपशहर प्रमुख नामदेवराव हजारे, गणेश पवार, मोहन देशमुख, माजी शहरप्रमुख नागोराव ठेंगडे, जि.प. सभापती विजय खानझोडे, सुरेश कर्हे, बालाजी वानखेडे, खंदारे महाराज, अशोक शिराळ, बाळु जैरव, गजानन ठेंगडे, गणेश गाभणे, केशव डुबे, चंदु खेलुरकर, बंडू शिंदे, बबलु अहीर, सतिश खंदारे, गजानन भुरभुरे, सागर धवसे, बालु माल, पांडूरंग पांढरे यांच्यासह जिल्हयातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी अथक परिश्रम घेतले.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ