पोहरादेवी, उमरी खुर्द येथे हॉटेल, प्रसाद, दुकानांचे मंडप उभारण्यास मनाई
मंडप हटविण्याबाबत पोलीस प्रशासन, ग्रामपंचायतीला सूचना
वाशिम, दि. २० : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज संस्थान व उमरी खुर्द येथे होणारी यात्रा मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ४३ अन्वये रद्द करण्यात आली आहे. तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये २३ मार्च ते ५ एप्रिल २०२० दरम्यान संत सेवालाल महाराज संस्थान, पोहरादेवी व उमरी खुर्द येथे पाळीव प्राण्याची बळी देण्यास, पाळीव प्राण्याची वाहतूक करण्यास, पाळीव प्राणी जमविण्यास व हॉटेल, प्रसाद व इतर दुकानांचे मंडप (स्टॉल) लावण्याकरिता निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे संत सेवालाल महाराज संस्थान, पोहरादेवी व उमरी खुर्द येथे यात्रेच्या अनुषंगाने हॉटेल, प्रसाद व इतर हॉटेल, प्रसाद व इतर दुकानांचे मंडप (स्टॉल) लावले जाणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिल्या आहेत.
गर्दीमुळे होणारा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पोहरादेवी, उमरी खुर्द येथील यात्रा रद्द करण्यात आली आहे. तसेच मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१) (ख) अन्वये संत सेवालाल महाराज संस्थान, पोहरादेवी व उमरी खुर्दकडे जाणारे ८ मार्ग २३ मार्च ते ५ एप्रिल २०२० या कालावधीत वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. २३ मार्च ते ५ एप्रिल २०२० या कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये संत सेवालाल महाराज संस्थान, पोहरादेवी व उमरी खुर्द येथे व यात्रेच्या परिसरात ५ व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींनी एकाच ठिकाणी जमाव करण्यास प्रतिबंध करणारा जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. पोहरादेवी व उमरी खुर्द येथे हॉटेल, प्रसाद व इतर हॉटेल, प्रसाद व इतर दुकानांचे मंडप (स्टॉल) लावण्यास सुध्दा मनाई करण्यात आली असून अशाप्रकारे मंडप (स्टॉल) उभारण्यात आले असल्यास ते काढण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी जिल्हा पोलीस प्रशासन व संबंधित ग्रामपंचायतींना दिल्या आहेत.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ