Ticker

6/recent/ticker-posts

देपूळ येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा


देपूळ येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
फ्लायवेल एज्युकेशनल फाउंडेशनचे आयोजन
वाशीम - तालुक्यातील देपुळ येथे फ्लायवेल एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने 28 फेब्रुवारी रोजी विज्ञान दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी गंगावणे हे तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. सीमा घुगे यांची उपस्थिती होती. यावेळी सीमा घुगे यांनी चालू काळाच्या धर्तीवर वैज्ञानिक दृष्टीकोनावर विशेष मार्गदर्शन केले. बालाजी गंगावणे यांनी विज्ञान दिनाचे महत्व सांगीतले. ते म्हणाले की, 28 फेबु्रवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञानदिन म्हणून पाळला जातो. याचे कारण म्हणजे याच दिवशी थोर शास्त्रज्ञ सी.व्ही.रामन यांच्या प्रकाशाच्या विकरणाच्या नियमांविषयी संशोधनाला नोबेल पारितोषीक मिळाले होते. परदेश प्रवासाला निघालेले रामन जहाजाच्या डेकवर उभे होते. वर निरभ्र, निळं आकाश होतं तर सभोवती निळं अथांग पाणी. त्यांच्या जागरूक मनात एकदम प्रश्न उमटला, की हवा आणि पाणी ही दोन वेगळी माध्यमं, त्यांची अंतरंही वेगळी, तरीही रंग निळाच का दिसतो? या छोटया कुतूहलाच्या समाधानार्थ त्यांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांना नोबेल पारितोषिक मिळालें. कोणताही निष्कर्ष हा प्रयोगानं तपासून बघता आला पाहिजे हे विज्ञानाचं आधारतत्त्व आहे. कार्यक्रमाचे संचालन प्रभाकर भेंडेकर यांनी तर आभार प्रदर्शन सखाराम ढोबळे यांनी केले. कार्यक्रमाला विठ्ठल घुगे, निर्मला घुगे, संगीता आंधळे, दिलीपराव घुगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.