अक्षया सुडके विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या महिला संघात
जनमाध्यम न्युज मिडीया
कारंजा :1 मार्च -
एस.सी.ए.स्टेडियम,राजकोट येथे दिनांक 22 फेब्रुवारी 2020 ते 4 मार्च 2020 पर्यंत संपन्न होणार्या 8 राज्यांच्या ज्युनिअर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेकरिता कारंजा शहरातील कु अक्षया सुनील सुडके हिची विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या ज्युनिअर महिला संघात निवड करण्यात आली. .कु अक्षयाची निवड ही सलामीचा फलंदाज म्हणून करण्यात आली आहे.
ही निश्चितच कारंजा नगरिकरिता अभिमानाची बाब आहे. कु अक्षया ही स्थानिक श्री संत गजानन महाराज हॅण्डबॉल क्लब,कारंजा येथे हॅण्डबॉल या खेळाचा सराव करते.हिने या आधीसुद्धा महाराष्ट्राच्या राष्ट्रीय संघात हॅण्डबॉल व डॉजबाल या खेळात प्रतिनिधित्व केलेले आहे.तसेच राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत सुवर्ण व राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत वाशिम जिल्ह्याला रजत पदक प्राप्त करून दिले होते. राजकोट येथे संपन्न होणार्या क्रिकेट स्पर्धेत विदर्भासह,गुजरात कर्नाटक, छत्तीसगड, सौराष्ट्र, त्रिपुरा, उत्तराखंड व तामिळनाडू या 8 संघांचा समावेश करण्यात आला आहे.कु अक्षयाने भविष्यात आपल्या खेळात आणखी मेहनत घेऊन भारताच्या क्रिकेट संघात स्थान मिळवावे अशी तिच्या आई वडिलांची इच्छा आहे.तिने आपल्या यशाचे श्रेय आई वडील या सह आपल्या प्रशिक्षकांना दिले आहे.