Ticker

6/recent/ticker-posts

मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयात पदवीदान समारंभ


मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयात पदवीदान समारंभ
वाशिम, 2 मार्च- मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वाशीम येथे दि. 28.02.2020 रोजी दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ.नारायणराव गोटे हे होते. उदघाटक म्हणून वाशीम शहर पोलीस स्टेशन च्या ठाणेदार योगिता भारव्दाज ह्या होत्या. तर प्रमुख उपस्थितांमध्ये माउंट कारमेल शाळेचे प्राचार्य फादर नेल्सन वर्गीस, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. सचिदानंद बीचेवार, डॉ.विजय काळे, डॉ.जी.एस.कुबडे यांचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. आपल्या प्रास्ताविकात डॉ.दीपक दामोदर यांनी कार्यक्रमाचा आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर एकूण 25 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. कार्यक्रमाच्या उदघाटक ठाणेदार योगिता भारव्दाज यांनी विद्यार्थ्यांना पदवी चे महत्व पटवून देत सखोल परिश्रम हाच यशाचा एकमेव मार्ग आहे असे मत मांडले. याप्रसंगी फादर नेल्सन वर्गीस, डॉ.सचिदानंद बीचेवार, डॉ.विजय काळे व डॉ.जी.एस.कुबडे यांचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. आपल्या अध्यक्षीय मनोगत  डॉ.नारायणराव गोटे यांनी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच यथोचित असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अश्विनी लांडगे व आभार प्रदर्शन डॉ. वेदप्रकाश डोणगावकर यांनी केले.