Ticker

6/recent/ticker-posts

परमपूज्य श्री डॉ. बसवलिंग पट्टद्देवरू यांना बसव राष्ट्रीय पुरस्कार घोषित


परमपूज्य श्री डॉ. बसवलिंग पट्टद्देवरू यांना बसव राष्ट्रीय पुरस्कार घोषित
महाराष्ट्र बसव परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा हिरेमठ संस्थान भालकीचे पीठाधिपती. 
वाशीम - दि. 21 मार्च - मराठीमध्ये 155 पुस्तके प्रकाशित करून महाराष्ट्राला बसव साहित्याची ओळख करून देणारे सच्चे शरण. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात व तेलंगणातील 31 जिल्ह्यात संचार करून बसवतत्त्व प्रसारित केलेले महाजंगम. हिरेमठ संस्थान विद्यापीठ ट्रस्ट स्थापन करून दरवर्षी हजारो गरीब व होतकरू मुलांना शिक्षण देणारे शिक्षणतज्ज्ञ. सर्व जातीधर्मातील 350 मुलांना आपल्या मठात आश्रय देऊन त्यांना  शिक्षण, जेवन व निवासाची विनामूल्य व्यवस्था करणारे संन्यासी. अनाथ मुलांची माउली. कला, साहित्य, शिक्षण, धर्म, समसमाज निर्माण, दीन दलित, महिला यांच्या  संवर्धनासाठी अविश्रांतपणे श्रमणारे धीमंत. कन्नड, मराठी, तेलुगू, हिंदी भाषेत बसव साहित्य प्रकाशित करणारे बसव परंपरेचे वारसदार असलेल्या अप्पाजींना 2019-20 वर्षाचा कर्नाटक सरकारचा बसव राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाल्याने देशभरातील बसवप्रेमींना अत्यानंद झाला आहे.