विद्यार्थ्यांनी केला जलसाक्षर होण्याचा संकल्प
जनमाध्यम न्युज मिडीया
कारंजा :1 मार्च - येथील झील इंटर्नशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लघु व पाटबंधारे विभाग कारंजा यांच्या वतीने व जलदुत रविंद्र इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली जलसाक्षर होण्याचा संकल्प जलसाक्षर पर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी केला.
यावेळी जलसाक्षरते बाबत सखोल अशी माहिती जलदुत रविंद्र इंगोले यांनी विद्यार्थ्यांना करून दिली तसेच सापसिडी या खेळाद्वारे जलसाक्षरतेच्या विवीध मुद्द्यावर विद्यार्थ्यांना अवगत करण्यात येऊन विद्यार्थ्यांनी जलसाक्षर होऊन आम्ही दुष्काळावर मात करू असा संकल्प बोलून दाखविला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सतीश बिजवे, शाळेचे अध्यक्ष सुनील मेश्राम, सर्व शिक्षकवर्ग विद्यार्थी उपस्थित होते.