विधान परिषदेच्या इच्छुक उमेदवारांनी १४ मार्च पर्यंत टिळक भवन येथे अर्ज करावेत.
मुंबई, दि. ४ मार्च २०२०
आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी १४ मार्च पर्यंत प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे आपले अर्ज दाखल करावेत असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी केले आहे.
विधानपरिषदेच्या आगामी काळात रिक्त होणा-या जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे लेखी अर्ज मागवले आहेत. अर्जाचा नमुना टिळक भवन येथून मिळेल. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज १४ मार्च २०२० पर्यंत ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर पश्चिम, मुंबई’ येथे पाठवायचे आहेत.