Ticker

6/recent/ticker-posts

बेटी बचाओ अभियान व्यापक झाले पाहीजे

बेटी बचाओ अभियान व्यापक झाले पाहीजे


 माझी कन्या भाग्यश्री हे वाक्य प्रत्येकांनी नेहमी डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. त्याच बरोबर प्रत्येकांनी मुलीकडे बघण्याची मानसिकता बदलली पाहिजे. कारण प्रत्येकजण आपल्या कुटूंबामध्ये मुलालाच श्रेष्ठ समजणे कितपत बरोबर आहे.? नेहमी म्हटल्या जाते की, मुलगा माझ्या घराचा दिवा असून, पुढे तोच या घराचा वारसदार राहणार आहे. असे म्हणने पुर्णताह चुकीचे आहे. विशेष महत्वाचे म्हणजे, मुलगा असो, की मुलगी दोघानांही बरोबरीचेच समजले पाहिजे कारण मुलीसुध्दा कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. हे अनेकदा सिध्द झाले आहे. तरी सुध्दा समाजाची मानसिकता पुर्णपणे बदललेली दिसुन येत नाही. त्यामुळे सामाजिक परिवर्तनासाठी सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. 
 विशेष महत्वाचे शासनामार्फत सुध्दा वेगवेगळ्या माध्यमातून योजना द्वारे, प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी आपली सर्वांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी कायद्यांची कडक अंमलबजावणी, प्रबोधन आणि प्रोत्साहन, अशा विविध मार्गाचा अवलंब हा सामाजिक प्रश्र सोडविण्यासाठी शासन पातळीवर व्यापक मोहिम हाती घेण्यात आली आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणुन महाराष्ट राज्यामध्ये मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलीचे शिक्षण, आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना संपुर्ण महाराष्ट राज्यात 1 एप्रिल 2016 पासुन लागू करण्यात आली आहे.
 महाराष्ट राज्यामध्ये मुलींचे शिक्षण, आरोग्यामध्ये सुधारणा करणे, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आर्थिक तुरतूद करणे, बालिका भ्रुणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलांइतकाच मुलींचा जन्म दर वाढविणे, या उददेशाने  राज्यात सुकन्या योजना’ सुरु करण्यात आली आहे. राज्यात मुलींचा जन्म्दर 1 हजार मुलींच्या 894 इतका आहे. मुलींच्या जन्मा बाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, आणि मुलाइतकाच मुलीचा जन्मदर वाढविणे. या उददेशाने बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या योजनेच्या धर्तीवरच मुलींचा जन्मदर वाढविणे  हा शासनाच्या योजनेचा उद्देश आहे. मुलगा वारस आहे, तर मुलगी पारस आहे. मुलगा सोन आहे. तर मुलगी सोन्याची खान आहे. मुलगा वंश आहे तर मुलगी अंश आहे.  मुलगा आन आहे तर मुलगी शान आहे. मुलगा तन आहे तर मुलगी मन आहे. मुलगा संस्कार आहे तर मुलगी संस्कृती आहे. मुलगा आग आहे तर मुलगी बाग आहे. मुलगा दवा आहे तर मुलगी दुआँ आहे. मुलगा भाग्य आहे तर मुलगी सौभाग्य आहे. मुलगा शब्द आहे तर मुलगी अर्थ आहे. मुलगा गीत आहे तर मुलगी संगीत आहे. यावरून सर्वांच्या लक्षात यायला पाहीजे मुलगी मुलापेक्षा कोणत्याच क्षेत्रात कमी नाही. त्यासाठी आपली सर्वांची पूर्णत: मानसिकता बदलणे आवश्यक आहे. तेंव्हा बेटी बचाव बेटी पढाव हे अभियान सर्व स्तरावर व्यापक झाले पाहीजे. त्यासाठी सर्वाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.