Ticker

6/recent/ticker-posts

उत्कृष्ट नाट्य प्रकारात भरारी संस्थेचा व्दितीय क्रमांक


कलावंत विद्या भगत लोककला उत्सवात सन्मानित


नेहरु युवा केंद्राचे आयोजन
वाशीम - वैयक्तीक स्वच्छता, बाळ संगोपन, बेटी बचाव, पाणी अडवा पाणी जिरवा, व्यसनमुक्ती या विषयावर आधारीत उत्कृष्ट नाट्यप्रकार सादर करणार्‍या मंगरुळपीर तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील भरारी बहूउद्देशिय संस्था व्दितीय क्रमांक देवून यातील महिला कलावंत विद्याताई भगत यांना सन्मानित करण्यात आले.
    युवा व खेल मंत्रालय भारत सरकारव्दारे संचालीत नेहरु युवा केंद्र वाशीम व राजरत्न अल्पसंख्यांक शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने स्थानिक लोकमान्य टिळक स्मारकमध्ये 24 फेब्रुवारी रोजी आयोजीत जिल्हास्तरीय लोककला उत्सवात हा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक सम्यक मेश्राम, उद्घाटक उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, विशेष अतिथी राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते निलेश सोमाणी, जिल्हा युवापुरस्कारप्राप्त भगवान ढोले, भिमराव पट्टेबहादुर, राजरत्न संस्था अध्यक्ष विनोद पट्टेबहादुर, परिक्षक सिने कलावंत अरविंद उचित, सिने अभिनेत्री हंसिनी उचित, अनिसचे पी.एस. खंदारे आदींची उपस्थिती होती. यावेळी भरारी संस्थेच्या कलावंतांनी विविध सामाजीक विषयावर उत्कृष्ट नाट्यप्रकार सादर केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते यातील कलावंतांना दुसर्‍या क्रमांकाचे पारितोषीक देवून सत्कार करण्यात आला. या जिल्हास्तरीय लोककला उत्सवात विविध कलापथक मंंडळासह कलावंतांनी सहभागी होऊन लोककला, भारूड, गोंधळ, नाटक, लावणी आदी विषयावर कला संच व वैयक्तीक एकल कला सादर केली. या नाट्यप्रकारात भरारी बहूउद्देशिय संस्थेच्या गायीका विद्याताई भगत, शाहीर निरंजन भगत, हार्मोनियम वादक दौलत पडघान, झांजवादक आलोकरत्न भगत, ढोलकीवादक रवि तेलगोटे, सुनिल लबडे आदी कलावंतांनी सहभाग घेतला.