स्मशान होलीकोत्सवात केली व्यसनाची होळी
दोन तास स्वच्छता अभियान : संकल्प फाऊंडेशनचा उपक्रम
वाशीम - सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या संकल्प मल्टीपर्पज फाऊंडेशनच्या वतीने 9 सप्टेंबर रोजी मोक्षदाम स्मशानभूमिमध्ये स्मशान होलीकोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या आधी तब्बल दोन तास अथकपणे स्वच्छता अभियान राबवून स्मशानभूमिचा परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर स्मशान होलीकोत्सवात व्यसनाची होळी करण्यात आली. संकल्प फाऊंडेशनच्या वतीने गेल्या चौदा वर्षापासून हा उपक्रम अव्याहत व यशस्वीपणे सुरु आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती व स्वच्छतेचा संदेश देण्यात येत आहे.
या कार्यक्रमात प्रारंभी स्मशानभूमिचा संपूर्ण परिसर खराट्याने झाडून स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर गुटखा, विडी, सिगारेट, तंबाखु, दारु, गांजरगवत, प्लॉस्टीक पन्न्या आदींची होळी पेटविण्यात आली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे हे पंधरावे वर्ष होते. या उपक्रमात समाजसेवक राजाभैय्या पवार, न.प.चे माजी मुख्याधिकारी वसंत इंगोले, अॅड. सुरेश टेकाळे, वृषाली टेकाळे, रवि गुप्ता, मोरया ब्लड डोनर ग्रुपचे महेश धोंगडे, भागवत मापारी, संकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशील भिमजीयाणी, वैभव रणखांब, संदीप पिंपळकर, कांतीलाल पाटील, विकास उफाडे, राम महाले, विठ्ठल महाले, दिव्या देशमुख, विशाल ठोकळ आदींनी या समाजसेवी उपक्रमात सहभाग घेवून यशस्वीरित्या पार पाडला.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ