मुलींचा वाढला आत्मविश्वास
एकात्मीक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्पाचे आयोजन
वाशिम, 5 मार्च - महिला व बालविकास विभागाच्या वतीने एसएजी योजनेअंतर्गत 5 मार्च रोजी एकात्मीक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्प कार्यालयात किशोरवयीन मुलींकरीता प्रशिक्षण शिबीर उत्साहात पार पडले. या शिबीराच्या अध्यक्षस्थानी बालविकास प्रकल्प अधिकारी सुभाष राठोड हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रधानमंत्री कौशल्य विकास विभागाच्या अधिकारी श्रीमती सुनंदा बजाज, समाजसेविका डॉ. मंजुश्री जांभरुणकर, पर्यवेक्षीका श्रीमती सुरेखा राठोड, तारामती घुगे, सुरेखा जाधव यांची उपस्थिती होती. या शिबीरात ‘कळी उमलतांना’ या विषयावर वैद्यकिय मार्गदर्शन करुन शासनाच्या उपक्रमात प्रभावी सहभाग नोंदविण्यात आला. किशोरवयींन मुलींना व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य, निर्णय क्षमता, स्व-विकास, जीवन कौशल्य, नेतृत्व विकास, स्त्री-पुरुष समानता, किशोरवयीन समस्या व त्याचे निवारण, उद्योगधंद्याची माहिती, विविध स्वयंरोजगार प्रशिक्षण, आरोग्याची काळजी, मानसिक व शारीरीक बदलाबाबत जागरुकता, शासकीय योजना, महिलांविषयक कायदे, योगा आदींबाबत उपस्थित मान्यवरांनी माहिती दिली. बालविकास प्रकल्प अधिकारी सुभाष राठोड यांनी उपस्थित मुलींना विविध विषयावर माहिती देवून त्यांचे मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री कौशल्य विकास विभागाच्या अधिकारी श्रीमती सुनंदा बजाज यांनी शिलाई मशीन, फॅशन डिझायनिंग, ब्युटीपार्लर, नर्सिग प्रशिक्षण, आदींविषयी माहिती दिली. तर समाजसेविका डॉ. मंजुश्री जांभरुणकर यांनी किशोरवयीन मुलींना आरोग्य व आहारविषयक समयोचित मार्गदर्शन केले. तसेच किशोरवयीन वयामध्ये होणारे शारीरीक व मानसिक बदल आणि योगविषयक माहिती देवून योगाचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. पर्यवेक्षीका सुरेखा राठोड यांनी आहार व आरोग्य, लैंगीक छळ, गुड टच बॅड टच आदींबाबत माहिती दिली. यावेळी पर्यवेक्षीका सुरेखा जाधव व तारामती घुगे यांनी मुलींना विविध विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका सौ. वंदना सुतार, सुरेखा गायकवाड, सिंधु जाधव, धामणकर, मिरा राठोड, संगीता खडसे, रंजना जाधव, मिरा मुंगनकर यांच्यासह वाशीम बिटमधील अंगणवाडी कार्यक्षेत्रातील किशोरवयीन मुली उपस्थित होत्या. या कार्यशाळेत मान्यवरांनी केलेल्या उपयुक्त मार्गदर्शनामुळे किशोरवयीन मुलींचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ