Ticker

6/recent/ticker-posts

तुफान गारपीट आणि वादळी पावसाने वाशीमकरांच्या उरात धडकी


तुफान गारपीट आणि वादळी पावसाने वाशीमकरांच्या उरात धडकी
वाशीम - मार्च महिन्यातील उन्हाळी ऋतूच्या तोंडावर दिवसभर वातावरणात गारवा आणि ढगाळ वातावरण असतांना आज, (ता. १८) रोजी रात्री १०.३० च्या सुमारास शहरात वादळी वार्‍यासह जोरदार गारपीटीने वाशीमकरंाच्या उरात धडकी बसली. आकाशातून तब्बल १० ते १५ मिनीटे सुपारीएवढ्या किंबहूना त्याहुनही मोठ्या आकाराच्या गारांनी वाशीम शहराला झोडपून काढले. अनेक घरांवर टिनपत्रे असल्यामुळे या गारांच्या आवाजाने घरांवरील टिनपत्रेही हादरल्यासारखी झाली होती. तब्बल १० मिनीटे अचानक झालेली गारपीट आणि त्यानंतर पडलेल्या वादळी पावसाने रस्त्यावरील तुरळक रहदारी असलेले वाहनधारक आणि पादचार्‍यांची त्रेधातिरपीट उडाली. याआधी फेब्रुवारीपासून उन्हाळा सुरु होत असल्याचा अनुभव व त्यानंतर मार्च महिन्यातच तप्त उन्हाचे चटके बसल्याचा अनुभव याआधीच्या अनेक वर्षामध्ये नागरीकांनी पाहीले आहे. मात्र यावर्षी निसर्गाच्या ऋतुचक्रात बदलामुळे मार्चच्या उन्हाळ्यातही सकाळी थंडी, दुपारी ऊन आणि आता पाऊस असे तीन्ही ऋतू पहायला मिळत आहेत. ़वाशीम शहरासह थोड्याफार फरकाने व वेळेनुसार जिल्हयातील अनेक तालुके व ग्रामीण भागाला गारपीट व पावसाचा फटका बसला आहे. अवेळी आलेली गारपीट व पावसाच्या फटक्याने एकीकडे नागरीकांच्या आरोग्याची चिंता वाढली असतांनाच शेतकरी वर्गही हवालदील झाला आहे. आधीच गेल्या महिनाभरापासून कोरोना संकटामुळे व्यापार व इतर व्यवहार ठप्प पडले असून हातावर कमावून सांजच्याला चुल पेटविणार्‍या मजुर वर्गापुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. कोरोना संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा दुरगामी परिणाम पडण्याचे संकेत अर्थतज्ञ देत आहेत. अशा दुहेरी संकटात शेतकरी, मजुर वर्गासह अनेकांच्या तोंडचे पाणी पळाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.