Ticker

6/recent/ticker-posts

मंगरुळनाथ येथें ‘हास्य फव्वारे’ मनोरंजनाचा कार्यक्रम

येऊन बसा अन् पोटभर हसा’
होलीकोत्सव व रंगपंचमीनिमित्त सार्वजनिक होलीकोत्सव समिती, अंकुर साहित्य संघ, राम ठाकरे मित्र मंडळाचे आयोजन
मंंगरुळनाथ, 4 मार्च - दैनंदिन ताणतणाव व स्पर्धेच्या युगात लोकांचे निखळ मनोरंजन व्हावे व मनोरंजनातून समाजप्रबोधन व्हावे या सामाजिक उदात्त हेतूने सोमवार दि . 09 मार्च रोजी जि.प.विद्यालयाचे प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
              सार्वजनिक होलीकोत्सव समिती , अंकुर साहित्य संघ , राम ठाकरे मित्र मंडळाच्या वतीने , ’ येऊन बसा अन् पोटभर हसा ’ हया हास्य काव्य मैफिलीचे  आयोजन करण्यात आले आहे .  या कार्यक्रमामध्ये वसंत परदेशी जिल्हा पोलीस अधिक्षक , वाशिम यांचे मार्गदर्शनात तयार झालेल्या ’ निर्भया लागली लढायला ’ पथनाटयाचे सादरीकरण राहल अवचार , शंकर सोळंके , शारदा रामावत , गणेश जाधव व संच करणार आहेत . ’ जांगळबुत्ता ’ फेम झी . टीव्ही मराठी हास्यसम्राट डॉ .मिर्झा रफी अहमद बेग यांची हास्य विनोदी ’ मिझा एक्सप्रेस ’ धावणार आहे . शिघ्रकवी डॉ स्वप्नील मानकर , यवतमाळ यांच्या बायकोचं गहाणं , इश्कचा फंडा , भली डेंजर धुयमाती , अश्या विनोदी हास्यरचना यावेळी सादर होतील . सुप्रसिध्द व - हाडी हास्यकवयत्री सौ . मधुराणी बनसोड , वाशिम यांची स्त्री प्रबोधन हास्यपर्वणी , तुया माया भेटीचा इचका इंदोय झाला . , मामी तुमची संगी हाये काही घरी . . . हया हास्यरचना सादर होतील , राज्य गुणवंत आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त हास्यकवी सुरेश गावंडे , चिखलागड , यांच्या लोकप्रबोधनात्मक हास्यरचना ,  या प्रसंगी ’ हास्यकल्लोळ 2020 ’ सप्त हास्यरंग ’ तुषार हास्यांचे . . . , क्षण स्मृतींचे . . . , या होळी विशेषांकाचे प्रकाशन सूद्धा होणार आहे . ज्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत साहित्यीकांच्या हास्यरचना , लेख , व्यंगचित्रे , विनोद आदी साहित्यांची मेजवाणी प्रकाशनानंतर प्रेक्षकांसाठी निशुल्क वितरणासाठी उपलब्ध होईल . प्रसंगी कचरायुक्त होलीकेचे दहन करून सलग दोन - तीन तासांच्या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन व सामाजिक लोकप्रबोधन केले जाणार आहे . हया कार्यक्रमास  माजी मंत्री सुभाष ठाकरे, जि . प अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे , पं . स . सभापती दिपाली इंगोले , जिनिंग / प्रेसिंगचे उपाध्यक्ष राजेंद्र मिसाळ , कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव रामकृष्ण उर्फ बाळु पाटील, नगरसेवक अनिल गावंडे, मोहनसिंह ठाकुर , क्रिडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त  संजय मिसाळ , अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा मानोरा चे शाखाधिकारी सुधिर बेंद्रे,राज्य ग्रामसेवक युनियनचे तालुकाध्यक्ष राजेश ठाकरे ,सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष चंद्रकात पाकधने, राजकुमार गावंडे , सरपंच तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमेश गावंडे , बुलढाणा अर्बन बँकेचे संचालक गिरीष बाहेती इण्डेन गॅस एजन्सी शेलुबाजार चे संचालक जयकुमार गुप्ता , कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय भोयर, प्रविण ठाकरे , डॉ . आशिष खोडके,सुरेशकुमार छल्लाणी , तहसिलदार किशोर बागडे , ठाणेदार धनंजय जगदाडे,शिक्षणाधिकारी अंबादास मानकर ,प्रा. दिलीप आंबेकर ,कार्यक्रम आयोजक राम पाटील ठाकरे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे .  कार्यक्रमाचा लाभ जास्तीत - जास्त प्रेक्षकांनी घ्यावा असे आवाहन दिपक राऊत जिल्हाध्यक्ष अंकुर साहित्य संघ,सचिन मांढरे-अध्यक्ष होलीकोत्सव समिती , तानाजी आंबेकर , रशिद शादा, संजय कावरे , वसंत मोरे , अनंता काळे , आनंद राऊत , गट्टु सुखाडिया , दिलीप डोंगरे , शिवदास सुर्यपाटील , सुनिल किरसान , गजाननाआप्पा घळे , श्रीकांत ठाकरे , स्वप्नील ठाकरे , रिता राऊत , रश्मी इंगळे , चैतन्य ठाकरे , राम ठाकरे मित्र मंडळ , शिवराज मित्र मंडळ , सर्वधर्म मित्र मंडळ , शिवरत्न मित्र मंडळ , कवीमंच व समस्त शिक्षक वृंद जि . प . माध्यमिक विद्यालय मंगरूळपिर यांचे वतीने करण्यात आले आहे .