महात्मा फुले ब्रिगेडच्या वाशीम शहराध्यक्षपदी शशिकांत जाधव यांची नियुक्ती
वाशीम - येथील युवा सामाजीक कार्यकर्ते शशिकांत जाधव यांची सामाजीक सेवेत अग्रेसर असलेल्या महात्मा फुले ब्रिगेडच्या वाशीम शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंह सैनी, राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवदास महाजन, राष्ट्रीय महासचिव बलदेव सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दत्तात्रय चांबारगे यांनी नुकत्याच दिलेल्या एका नियुक्तीपत्राव्दारे जाधव यांच्यावर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली.
महात्मा फुले ब्रिगेडच्या तत्वाने भारतभर नवचैतन्य निर्माण केले जात आहे. ज्यामुळे समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजीक व राजकीय घडामोडीला गती प्राप्त होत आहे. क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची विचारधारा तळागाळातील वंचितांपर्यत पोहचवून गोरगरीबांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटीबध्द राहावे. यासोबतच सर्व समाजातील शोषीत, पिडीतांच्या न्याय हक्कासाठी आपण आपले अविरत योगदान देवून त्यांच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजीक व राजकीय उन्नतीसाठी सदैव कटीबध्द राहून त्यांना नवीन दिशा प्रदान करावी असे जाधव यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात नमूद केले आहे. युवा कार्यकर्ते शशिकांत जाधव यांचा पत्रकारीतेसोबतच सामाजीक कार्याच्या माध्यमातून परिसरात दांडगा जनसंपर्क आहे. महात्मा फुले ब्रिगेडच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
- Home-icon
- ई – पेपर
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- देश – विदेश
- सामाजिक
- शासकीय
- आर्थिक
- शैक्षणिक
- शेती/शेतकरी
- ताज्या बातम्या
- विशेष लेख
- महाराष्ट्र
- नोकरी
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ