Ticker

6/recent/ticker-posts

पुण्यात रक्ताचा तुटवडा होवू नये याकरिता काँग्रेस पक्षातर्फे रक्तदान शिबीर !: मोहन जोशी

पुण्यात रक्ताचा तुटवडा होवू नये याकरिता काँग्रेस पक्षातर्फे रक्तदान शिबीर !: मोहन जोशी


पुणे. दि, २२ मार्च २०२० 


आगामी काळात रक्ताचा तुटवडा होवू नये याकरिता छोटी छोटी शिबीरे घेण्याचे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर शासन अनेक उपाययोजना करीत आहे. त्याला काँग्रेस कार्यकर्त्यांचा पाठिंबा असून आरोग्यमंत्र्यांच्या आवाहनानुसार काँग्रेस पक्षातर्फे येत्या सोमवारी दिनांक २३ मार्च २०२० रोजी काँग्रेस भवन येथे रक्तदान शिबीर आयोजित केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.


रक्तपेढ्यांसाठी पुरेसा रक्तसाठा उपलब्ध व्हावा. पण, तसे होताना सार्वजनिक ठिकाणची गर्दी टाळावी याची दक्षता शिबीरात घेतली जाणार आहे. सोमवारी सकाळी दहा वाजता शिबीरास प्रारंभ होईल. गर्दी होवू नये यासाठी प्रत्येक अर्ध्या तासाला पाच कार्यकर्ते रक्तदान करतील अशी माहिती जोशी यांनी पत्रकात दिली आहे.